ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियन सेल्वन’ देणार ‘बाहुबली’ला टक्कर; समोर आला ट्रेलर

मुंबई, 7 सप्टेंबर-   मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली आता संपली आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच रोमांच निर्माण केला आहे. चाहते आणि प्रेक्षक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने लोकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. 3.23 मिनिटांच्या या ट्रेलरला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हा ट्रेलर अतिशय रंजक आहे. यामध्ये सिंहासनासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाचा ट्रेलर तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषेत रिलीज झाला आहे. त्याचा ट्रेलर इतका भव्य आणि धमाकेदार आहे की तो पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याची तुलना ‘बाहुबली’शी देखील करत आहेत. अशात आता हा चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड मोडीत काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मणिरत्नम यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन’ हा 10व्या शतकातील चोलांचा गौरवशाली इतिहास दर्शवणारा आहे. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यक्तिरेखेत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिची व्यक्तिरेखा आणि सौंदर्य पाहून तुम्हाला ‘देवदास’मधली पारो किंवा ‘जोधा अकबर’मधील जोधाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण ऐश्वर्याचा हा लुक या दोन्ही चित्रपटांसोबत मिळताजुळता आहे. या चित्रपटात अभिनेत्री दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती राजकुमारी नंदिनी आणि मंदाकिनी देवीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय शोभिता धुलिपाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यामध्ये ती राणी वनथीची भूमिका साकारणार आहे. सोबतच साऊथचा सुपरस्टार अभिनेता विक्रम यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

(हे वाचा:Aashiqui 3 मध्ये कार्तिकसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री? दिग्दर्शकाने स्वतः केला खुलासा )
विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन’ दोन भागात रिलीज होणार आहे. सध्या त्याचा पहिला भाग पूर्ण झाला असून, त्याचा ट्रेलर नुकतंच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ऐश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, लाल आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन,video व्हायरल

मुंबई, 07 सप्टेंबर :  बिग बॉस मराठी 3 च्या धम्माल सीझननंतर बिग बॉस मराठी 4 …

अरुंधतीने साकारली गणरायाची मूर्ती; मालिकेत होणार बाप्पाचं आगमन!

मुंबई, 7 सप्टेंबर : सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सगळीकडे गणरायाच्या आगमनामुळे उत्साहाचं वातावरण आहे. …