SBI Recruitment: स्टेट बँकेत बंपर भरती, तरुणांनो ‘येथे’ पाठवा अर्ज

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 7, 2022, 2:56 PM

SBI Clerk Recruitment 2022 Notification: एसबीआय अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील SBI बँकांमध्ये ५००८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत.

 

SBI Recruitment
SBI Recruitment: स्टेट बँकेत बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
SBI Clerk Recruitment 2022: बॅकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India,SBI) ने एसबीआय लिपिक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. क्लर्क कॅटेगरीतील ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) च्या भरतीसाठी अधिसूचना निघाले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर जाऊन आपला अर्ज पाठवू शकतात.

या भरती अंतर्गत अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील SBI बँकांमध्ये ५००८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. SBI क्लर्क २०२२ साठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावले जाईल. ही परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २० वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया
SBI लिपिक पूर्व परीक्षा २०२२
SBI लिपिक मुख्य परीक्षा २०२२
SBI लिपिक भाषा चाचणी २०२२

SC/ST/PwBD/ESM/DESM श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तर सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

Government Job: मुंबई हायकोर्टात भरती, दरमहा ७८ हजार ते २ लाखांपर्यंत मिळेल पगार
SBI Clerk 2022 Recruitment: असा करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers वर जा.
येथे तुम्हाला ‘ज्युनियर असोसिएट्सची भरती’वर क्लिक करा. .
अर्ज तुमच्यासमोर उघडेल. हा फॉर्म पूर्णपणे भरा.
एकदा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र जोडा.
अर्जात भरलेले तपशिल अचूक असतील याची खात्री करा. स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या सूचनांचे पालन करा आणि अर्ज शुल्क भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

२७ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

कृषी विज्ञान केंद्रात भरती, पदवीधरांना ५६ हजार पगार मिळविण्याची संधी
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती, मराठी तरुणांना नोकरीची संधी

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

शिक्षणाचे नियंत्रण पुण्यातूनच कशाला?-शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

म. टा. प्रतिनिधी, नगर‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून तयार झालेले राष्ट्रीय शिक्षण धोरण विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने …

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती, मराठी तरुणांना नोकरीची संधी

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये (Mumbai Port Trust) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची …