मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिको लॅबोरिटी टेक्निशियनच्या ४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हा प्रशिक्षण कालावधी १ वर्षांचा असणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २,७५८ रुपये पगार दिला जाणार आहे.
एक्सरे टेक्नशियनच्या ६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हा प्रशिक्षण कालावधी १ वर्षांचा असणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २,७५८ रुपये पगार दिला जाणार आहे.
MPT Recruitment: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टेक्निशियन फार्मासुटिकल सायन्सच्या २ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा डिप्लोमा इन फार्मसी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हा प्रशिक्षण कालावधी १ वर्षांचा असणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३,५४२ रुपये पगार दिला जाणार आहे.
१४ ते १८ वर्षाच्या आतील उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
१६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्जावेळी उमेदवारांना ५० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या