गायक जस्टिन बीबरने आपली जगाची सफर मध्येच रद्द केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जस्टिन बीबरला हि वर्ल्ड तूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन बीबरने इंस्टा पोस्टद्वारे जगाचा दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्याने चाहत्यांना माहिती देणारी एक लांब पोस्ट लिहिली आहे. जस्टिन बिबर्न आजारपणानंतर विश्रांती घेऊन पुन्हा वर्ल्ड टूरला सुरुवात केली होती. पण गेल्या आठवड्यात त्याने रिओमध्ये परफॉर्म केले. त्याबद्दल त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मला ब्राझीलच्या लोकांना माझे गाणे ऐकवायचे होते. पण स्टेजवर गेल्यावर मला खूप थकल्यासारखे वाटले. तेव्हा माझ्या लक्षात आले की यावेळी मी माझ्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. म्हणून मी टूरमधून विश्रांती घेत आहे..मी ठीक होईन पण त्यासाठी मला विश्रांतीची गरज आहे, जेणेकरून मी लवकर बरा होऊ शकेन.”
हॉलिवूडमधील त्याचे सहकारी, त्याचे देशभरातील चाहते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. जस्टिनने देखील त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन या पोस्टमधून केले आहे. दरम्यान बीबर कुटुंबीयांवर लागोपाठ संकटं येत आहेत, यावर्षी मार्चमध्ये जस्टिनची पत्नी हेली बीबर हिला देखील मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा – Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली ‘माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर…’
जस्टिन बीबर त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील विविध देशांमध्ये दौरा करणार होता. दरम्यान त्याचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जस्टिन बीबर भारतात येणार असल्याचे वृत्तही समोर आले होते. आता या आजारामुळे त्याचा भारतदौराही रद्द होण्याची शक्यता आहे. याआधी २०१७ साली जस्टिन भारतात आला होता.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या