नेपाळ क्रिकेट टीम कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षांच्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लामिछानेही आयपीएलमध्ये खेळला होता. त्याने उत्तम कामगिरी केली होती.
Nepal Police starts investigation over alleged rape complaint against Nepali national Cricket team Captain Sandeep Lamichhane, after a minor aged 17 lodged the case, stated Nepal Police in a statement
(Photo courtesy: Sandeep Lamichhane’s Twitter handle) pic.twitter.com/3HK386a6n5
— ANI (@ANI) September 7, 2022
संदीपने २०१८ आणि २०१९ रोजी आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. तो दिल्ली टीममधून खेळला होता. त्याच्यावर लिलावात २० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. २०१८ मध्ये त्याने ५ विकेट्स काढल्या होत्या. तर २०१९ मध्ये त्याने ८ विकेट्स काढल्या होत्या त्याच्या नावावर १३ विकेट्स आहेत.
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप सध्या नेपाळ टीमचं प्रतिनिधित्व करत केनियामध्ये क्रिकेट खेळत आहे.
क्रिकेट करिअर
संदीपची ओळख लेगस्पिनर म्हणून आहे. 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर नेपाळचं नेतृत्व त्याच्या खांद्यावर आलं. 2018 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. लिलावात दिल्ली कॅपिटल्सने संदीपला २० लाख देऊन आपल्या टीममध्ये घेतलं. आयपीएलमध्ये संधी मिळालेला तो नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या