उर्फी जावेद जेव्हा जेव्हा ती पापाराझींसमोर येते तेव्हा ती सर्वांशी मोकळेपणाने बोलत असते पण यावेळी ती काहीशी रागावलेली दिसली. ती पापाराझींवर चांगलीच भडकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या पापाराझीं चांगलेच धारेवर धरले होते. मंगळवारी संध्याकाळी उर्फी मुंबईतील अंधेरी येथे एका कार्यक्रमात पोहोचली. हा एक म्युझिक लॉन्च कार्यक्रम होता. यावेळी ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली. उर्फीने या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर ती रेड कार्पेटवर पोझ देत असताना कोणीतरी तिच्या कपड्यांवर कमेंट केली ज्यामुळे उर्फी भडकली.
उर्फी म्हणाली, ”मित्रांनो, मी हे ऐकून घ्यायला इथे आलेले नाही. जर तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची असेल तर आधी तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणीला आणि आईला अशा कमेंट द्या. आजच्या नंतर कोणीही माझ्या कपड्यांवर कमेंट करणार नाही…मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही. मी तुम्हा सर्वांचा खूप आदर करते आणि बदल्यात तुमच्याकडूनही तशीच अपेक्षा करते.”
हेही वाचा – Bigg Boss 16 : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची छोट्या पडद्यावर एंट्री; राज कुंद्रा ‘बिग बॉस 16’ मध्ये?; चर्चांना उधाण
दरम्यान, उर्फी जावेदनं शेअर केलेला हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीची दादा द्यावी लागेल कारण ती कुठून काय संकल्पना घेऊन येते आणि नवनवीन कपडे बनवते कुणीही तर्क लावू शकत नाही. पण आता यापुढे तिच्या कपड्यांवर तिच्यासमोर बोलायची कोणी हिम्मत करणार नाही.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या