Tag Archives: Russia

Russia-Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय परतले ; २४ तासांत १५ विमानं दाखल

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती ; पुढील २४ तासांसाठी १३ विमानं नियोजित असल्याचंही सांगितलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली …

Read More »

Video: युद्धाविरोधात ना’राजीनामा’… एकाच वेळी Live Telecast दरम्यान सर्वांनी सोडली नोकरी

रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल मंगळवारी बंद करण्यात आलं. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. युद्धाला नकार देत रशियाच्या एक आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑन एअर राजीनामा दिला आहे. या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” म्हणत राजीनामा दिला. रशियन अधिकार्‍यांनी युक्रेन युद्धाच्या कव्हरेजबद्दल त्यांचे ऑपरेशन स्थगित केल्यानंतर टीव्ही रेनच्या (Dozhd) कर्मचार्‍यांनी …

Read More »

Russia Ukraine War Live: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटर्सशी बोलणार

Ukraine Russia Crisis Live: रशिया-युक्रेन युद्धातील ताज्या घडामोडी.. Russia Ukraine Crisis Live: रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र …

Read More »

Russias attack on Ukraine : “बॉम्ब हल्ले होत असताना जिवंत परतण्याची शाश्वती नव्हती” ; वसईच्या ऐश्वर्याचा थरारक अनुभव

आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे. “शहरात बॉम्ब हल्ले होत असताना आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. सुखरूप परतायची आशा नव्हती, पण सुदैवाने मी माझ्या घरी पोहोचली. अशा शब्दात युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या वसईच्या ऐश्वर्या राठोड या तरुणीने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितले. वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड …

Read More »

युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे. हे हल्ले, जाळपोळ, मिसाईल्सचा मारा सुरू आहे, कारण युक्रेनच्या पोटात २१ व्या शतकातला महत्त्वाचा खजिना लपलाय. अतिशय किमती आणि मोठ्या खनिजासाठी हे युद्ध सुरू झालं आहे. तो खजिना म्हणजे युक्रेनच्या जमिनीखालच्या असलेल्या लिथियमच्या खाणी.  लिथियम हा नव्या युगाचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्त्रोत ठरणार आहे.  …

Read More »

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील गाड्यांच्या किमतीवरही होणार परिणाम! कार होऊ शकतात महाग

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होत आहे. भारतात पेट्रोल आणि वाहनांच्या किमती वाढताना दिसत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे. ऑटोमेकर फोक्सवॅगन, रेनॉल्ट आणि टायर निर्मात्या नोकिया टायर्ससह अनेक कंपन्यांनी शुक्रवारी युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर उत्पादन ऑपरेशन्स बंद करण्याची किंवा हलवण्याची योजना आखली …

Read More »

Petrol- Diesel Price Today: रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम, इंधनाचे वाढले दर; जाणून घ्या आजचा भाव

रशिया-युक्रेनमधील संघर्षाचा पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम जाणवत आहे. जाणून घ्या आजचा भाव Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा …

Read More »

अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड

मुंबई : जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत. यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात. (world news russia ukraine war know why shortage iodine)  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी थेट अणूयुद्धाची धमकी दिल्यानं युरोपच्या पोटात गोळा उठलाय. पुढचा मागचा विचार न …

Read More »

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात उपसले घातक ब्रह्मास्त्र

मास्को : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरुच आहे. (Russia Ukraine Conflict) रशियाने युक्रेनला चारीबाजुने घेरले तरी युक्रेनने जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान, रशियाचे सैन्य अखेर कीव्हमध्ये पोहोचलं आहे, तसा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेनची राजधानी पादाक्रांत करण्यास सुरूवात करण्यात येत आहे. याबाबत रशियाच्या लष्कराने व्हिडिओ जारी केला आहे. ‘युद्ध संपेपर्यंत युक्रेनवर हल्ले …

Read More »

Viral: भरधाव गाडी चालवताना पकडलं; चालकानं खापर फोडलं पुतिन आणि अणुयुद्धावर

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील एका व्यक्तीला पोलिसांनी वेगात गाडी चालवल्याप्रकरणी पकडल्यानंतर त्याने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आरोप केले. एका पोलिस अधिकार्‍याशी वाद घालणार्‍या अज्ञात व्यक्तीचे बॉडीकॅम फुटेज मंगळवारी फ्लॅगलर काउंटी शेरीफ ऑफिस फेसबुक पेजवर पोस्ट केले गेले. हा व्हिडीओ २४ फेब्रुवारी २०२२ चा होता. त्याच दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता. रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरने स्टॉप साइन असतानाही गाडी …

Read More »

Ukraine War: ‘आम्ही करून दाखवलं!’ रशियन लष्कराचे टँक घेऊन हाय-स्पीड राइडवर गेले युक्रेनियन, Video Viral

हे लोक टँकवर बसून जल्लोष करताना दिसत आहेत. मागच्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धाचे अनेक हादरवून टाकणारे व्हिडीओ आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणी रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनच्या निशस्त्र नागरिक त्यांना भिडताना दिसताहेत. काही जणांनी तर रशियन लष्कराला रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. युक्रेनमधून सतत हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या आणि व्हिडीओ येत आहेत. …

Read More »

रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त

मास्को : Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. सिटी काऊंसिल इमारतीवर रशियाने तुफानी बॉम्बहल्ला केला. त्यात ही इमारत नेस्तनाबूत झाली आहे. क्रुझ मिसाईलने रशियाने हे हल्ले केले आहेत. (Russia Ukraine Conflict) युक्रेनच्या खारकीव्हमध्ये रशियाने पुन्हा एकदा हल्ले वाढवले आहेत.  रशियाने खारकीव्ह, युक्रेनमध्ये मोठा स्फोट झाला आहे. रशियाने सिटी कौन्सिल इमारतीवर क्षेपणास्त्रे डागली आणि …

Read More »

विश्लेषण : देशाच्या रक्षणासाठी युक्रेनचे खेळाडू रणभूमीवर!

युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे प्रशांत केणी रशियाने केलेल्या आक्रमणानंतर एकीकडे देशवासी खेळाडूंकडून टीका होत असताना युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी बॉक्सर व्हिटाली आणि व्लादिमिर क्लिट्स्को बंधू, व्हॅसिली लोमाशेन्को, लेकसँड्र युसिक, सर्जी स्टॅखोवस्की या युक्रेनच्या खेळाडूंसह ड्नीप्रो फुटबॉल क्लब रणभूमीवर उतरला आहे. यात देशातील प्रतिष्ठित …

Read More »

मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने …

Read More »

रशियाची पुन्हा धमकी, जगावर अणुयुद्धाचे संकट गडद

मास्को : Russia Ukraine War : जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचे दिसत आहे. कारण आक्रमक झालेल्या रशियाने पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. तिसरे महायुद्ध हे अणुयुद्ध असेल आणि सर्वात विनाशकारी असल्याचे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले आहे. त्यामुळे अणुबॉम्ब हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Russia’s threat again, the crisis of nuclear war on the world once …

Read More »

LIC आयपीओचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचं लक्ष

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक वाईट बातमी आहे. बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे त्रस्त झालेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक वाईट बातमी आहे. बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे त्रस्त झालेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आतापर्यंतच्या माहितीनुसार सरकारने मार्च अखेरपर्यंत IPO लाँच करण्याची तयारी पूर्ण केली …

Read More »

युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy यांच्यावर का भाळल्या जगभरातील महिला?

नवी दिल्ली : रशियानं युक्रेनवर हल्ला केला आणि हा देश अक्षरश: दहशतीच्या छायेखाली आला. रशियाचा वेढा आणि मारा वाढत असताना युक्रेनियन नागरिक सर्वस्व पणाला लावून लढा देताना दिसत आहेत. त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आहे, राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy यांच्याकडून. (Russia Ukraine Conflict) देशाप्रतीचे त्यांचे सर्व व्हिडीओ जागतिक पातळीवर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत …

Read More »

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या

मुंबई : UKRAINE MBBS : भारतीय विद्यार्थी ( Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र त्या मागचेही कारणही तसेच आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे खर्च. भारतात डॉक्टर होण्यासाठी प्रचंड खर्च येतो. तर युक्रेनमध्ये राहूनही खर्च कमी येतो आणि युक्रेनमधून डॉक्टर झालेल्यांना …

Read More »

ऐन युद्धभूमीत भारताच्या तिरंग्याची शान, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा

Russsia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. तिथल्या नागरिकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकेलल्या विद्यार्थ्यांना मायेदशी आणण्यासाठी भारत सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. रोमानिया, पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवरुन भारतीय विद्यार्थ्यांना आणलं जात आहे.  अशा कठीण काळात भारताच्या तिरंगामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचे प्राण तर वाचलेच, पण पाकिस्तान आणि तुर्कस्तानचे नागरिकही आपले प्राण वाचवण्यात यशस्वी …

Read More »

रशियन सैनिकाला युक्रेनियन नागरिकाची कोपरखळी; बस की आता, परत रशियाला नेऊ का?

नवी दिल्ली : जागतिक पटलावरल सध्या कोणत्या गोष्टीची चर्चा आणि त्याहीपेक्षा कोणत्या गोष्टीबाबत चिंता असेल, तर ती आहे रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये धुमसणारं युद्ध. (Russia Ukraine Conflit) बलाढ्य रशियानं काही दिवसांपूर्वीच अखेर युद्धाचं रणशिंग फुंकलं आणि युक्रेनच्या राजधानीसह इतर भागांमध्ये भयंकर हल्ले घडवून आणले.  मिसाईल हल्ले करत युक्रेनचा कणा मोडू पाहणाऱ्या रशियन सैन्यानं लष्करी कारवाया करणं सुरु ठेवलेलं …

Read More »