Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात उपसले घातक ब्रह्मास्त्र

मास्को : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरुच आहे. (Russia Ukraine Conflict) रशियाने युक्रेनला चारीबाजुने घेरले तरी युक्रेनने जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान, रशियाचे सैन्य अखेर कीव्हमध्ये पोहोचलं आहे, तसा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेनची राजधानी पादाक्रांत करण्यास सुरूवात करण्यात येत आहे. याबाबत रशियाच्या लष्कराने व्हिडिओ जारी केला आहे. ‘युद्ध संपेपर्यंत युक्रेनवर हल्ले थांबवणार नाही, असे सांगत रशियाने युक्रेनविरोधात घातक हत्यार उपसले आहे. रशिया S- 400ने युक्रेनवर हल्ला करणार आहे.

रशियाच्या हल्ल्यांनी युक्रेन बेजार झाले आहे. मात्र युक्रेनचा अजून पराभव झालेला नाही. युक्रेनविरूद्ध रशियाने आता आपलं ब्रह्मास्त्र काढले आहे. काय आहे हे ब्रह्मास्त्र? दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी घोषणा केली आहे की, ‘युद्ध संपेपर्यंत युक्रेनवर हल्ले थांबवणार नाही. अनेक देश रशियावर हल्ल्याच्या तयारीत आहेत, असे लावरोव्ह यांनी म्हटले आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत रशियन मंत्र्याना दावा केला आहे.

रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मिसाईल्सचा भडीमार सुरू केलाय. कीव्हचं सेंट्रल रेल्वे स्टेशन उडवून दिले आहे. तर खेरसन शहरही रशियाने जिंकलंय. आता युक्रेनविरोधात रशियानं आपली S- 400 ही एअर डिफेन्स सिस्टीम बाहेर काढली आहे. रशियन फौजांनी S- 400 मिसाईल सिस्टीमद्वारे युद्धाभ्यास सुरू केलाय. युक्रेनने रशियाला वारंवार ड्रोनद्वारे हल्ले करून बेजार केले आहे.

हेही वाचा :  Russia Ukraine war: …जेव्हा कुत्र्याचे पिल्लू युक्रेनच्या सैनिकांसाठी देते पहारा

रशियन ताफ्यांवर, त्यांच्या चिलखती गाड्यांवर, रणगाड्यांवर युक्रेनने प्रभावी ड्रोन हल्ले केले. मात्र आता या सगळ्या वेगवान ड्रोन्सविरोधात S- 400 सिस्टीम वापरली जाईल. याशिवाय युक्रेनच्या 15 शहरांवर रशियाने एकाच वेळी हवाई हल्ले करण्याची रणनीती आखलीय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.  

S- 400 म्हणजे काय?  

International sanctions won't affect S-400 defence deal with India: Russia

S- 400 ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे. आकाशातून होणा-या सर्व प्रकारच्या हल्ल्यांविरोधात ही सिस्टीम प्रभावी आहे. शत्रूचं मिसाईल, रॉकेट लाँचर, फायटर जेट्स, ड्रोन्स याद्वारे होणारे हल्ले या सिस्टीमने उध्वस्त होतात. जगातली या प्रकारातली सर्वाधिक अत्याधुनिक सिस्टीम अशी त्याची ओळख आहे. 

या सिस्टीमची वैशिष्ट्येही थक्क करणारी 

S- 400 चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही सिस्टीम कुठेही हलवता येते. ही यंत्रणा ट्रकवर बसवली असल्यानं एका जागेवरून दुसरीकडे सहज हलवता येते. यावरचे 92N6E ही रडार सिस्टीम प्रभावी आहे. 600 किलोमीटर दूरच्या मल्टीपल टार्गेटचा वेध ही रडार सिस्टीम घेते. अवघ्या 5 ते 10 मिनिटांत ही सिस्टीम रेडी होते. एकावेळी ही सिस्टीम 160 ऑब्जेक्ट्स ट्रॅक करते. एका टार्गेटसाठी 2 मिसाईल लाँच केली जातात. याशिवाय 30 किमी उंचीवरील लक्ष्य भेदण्याची त्याची क्षमता आहे. 

हेही वाचा :  रशिया दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शशी थरुर यांनी सुनावलं; करुन दिली वाजपेयींची आठवण

तुर्कस्तानच्या टीबी 2 या ड्रोनने आधीच रशियाला बेजार केलंय. या ड्रोनने आत्तापर्यंत रशियाचे 100 टँक, 20 चिलखती गाड्या उडवल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे रशियाने आपल्या सर्वात खतरनाक ब्रह्रास्त्राला परजायला सुरूवात केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …