विश्लेषण : देशाच्या रक्षणासाठी युक्रेनचे खेळाडू रणभूमीवर!


युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे

प्रशांत केणी

रशियाने केलेल्या आक्रमणानंतर एकीकडे देशवासी खेळाडूंकडून टीका होत असताना युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी बॉक्सर व्हिटाली आणि व्लादिमिर क्लिट्स्को बंधू, व्हॅसिली लोमाशेन्को, लेकसँड्र युसिक, सर्जी स्टॅखोवस्की या युक्रेनच्या खेळाडूंसह ड्नीप्रो फुटबॉल क्लब रणभूमीवर उतरला आहे. यात देशातील प्रतिष्ठित बॉक्सिंगपटू आघाडीवर आहेत.

बॉक्सर क्लिट्स्को बंधूंनी कशा प्रकारे युद्धभूमीवर धाव घेतली? –

बॉक्सिंगमधील उच्च वजनी गटातील अनेक जागतिक जेतेपदे नावावर असणारा व्हिटाली क्लिट्स्को हा युक्रेनची राजधानी कीव्हचा महापौर. त्याने १९९५मध्ये जागतिक सैनिकी क्रीडा स्पर्धेत सुपर हेविवेट गटात सुवर्णपदक कमावले होते. त्यामुळे व्हिटालीला रशियाविरुद्धच्या युद्धातील प्रतिष्ठित चेहरा मानले जाते. ‘गुड माॅर्निंग ब्रिटन’ या कार्यक्रमात व्हिटालीने ‘‘मला अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मी युद्धभूमीवर लढेन’’ असे सांगितले होते. म्हटल्याप्रमाणेच महापौर व्हिटाली युद्धात सहभागी झाला. व्हिटालीचा छोटा भाऊ व्लादिमिरने ६९ पैकी ६५ सामने जिंकले आहेत. आगामी बाॅक्सिंग हंगामात न्यूयॉर्कला जाऊन कॅनास्टोटा येथील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागासाठी तो सज्ज झाला होता. परंतु व्लादिमिरनेही लष्कारात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :  मुंब्रा रेल्वे पुलाच्या कामाला मुहूर्त

लोमाशेन्को आणि युसिकसुद्धा लष्करात सामील… –

व्हॅसिली लोमाशेन्को हासुद्धा युक्रेनमधील व्यावसायिक बॉक्सिंगपटू. फेदर, सुपरफेदर आणि लाइट या तिन्ही वजनी गटांतील जागतिक विजेतेपदे त्याने जिंकली आहेत. लोमाशेन्को हा बेल्गोरोड-डनेस्ट्रोव्स्की टेरिटोरियल डिफेन्स बटालियनचा भाग म्हणून लढाईसाठी सज्ज होता. याबाबतचे छायाचित्र त्याने ‘फेसबुक’वर पोस्ट केले आहे. लेकसँड्र युसिक हासुद्धा व्यावसायिक बॉक्सिंगपटू. दोन वजनी गटांची विश्वविजेतेपदे त्याने जिंकली आहेत. ‘आमच्यावरील हल्ले थांबवा. हे युद्ध थांबवा,’ असे आवाहन युसिकने केले आहे. युसिक आणि ब्रिटनच्या अँथनी जोशुआ यांचे बॉक्सिंगमधील वैर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. परंतु सध्याच्या युद्धजन्य स्थितीत रणभूमीवर सज्ज झालेल्या युसिकला जोशुआनेही पाठिंबा दिला आहे.

ड्नीप्रो फुटबॉल क्लबने कशा प्रकारे युद्धपथक तयार केले आहे? –

ड्नीप्रो हा युक्रेनमधील उच्च श्रेणीतील फुटबॉल क्लब मानला जातो. युद्धस्थितीत ड्नीप्रोने चक्क स्वयंसेवकांचे युद्धपथक तयार केले आहे. ‘एससी ड्नीप्रो-१’ असे या रेजिमेंटला नाव दिले असून, क्लबचे अध्यक्ष युरी बेरेझा हेच या युद्धपथकाचे नेतृत्व करीत आहेत. २०१४मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. तेव्हासुद्धा ‘ड्नीप्रो-१’ रेजिमेंट हे विशेष पथक कार्यरत होते. रशियन हल्ल्यापासून ड्नीप्रो शहराचे आणि ड्नीप्रोपेट्रोव्हस्क विभागाचे रक्षण करण्यासाठी हे पथक लढेल, असे बेरेझा यांनी सांगितले आहे. स्पोर्टिंग जिजॉन संघाचा आघाडीचा फुटबॉलपटू व्हॅसिल क्रॅव्हेट्सनेही फुटबॉल कारकीर्दीपेक्षा आता देशाचे रक्षण महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ‘‘माझ्या देशवासियांसाठी मी प्राणपणाने लढेन,’’ असा इशारा त्याने दिला आहे. विन्नीपेग फुटबॉल संघाचा गोलरक्षक स्व्हियाटिक आर्टेमेन्को युक्रेनच्या सैन्यदलात सामील होण्यासाठी प्रतीक्षेत आहे. ‘‘युद्धात प्राण गमावण्याची भीती बाळगण्यापेक्षा लढणे बेहत्तर,’’ अशा आशयाची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  'बाहेर उभी आहे, आत यायला दे' मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्याची उडाली भांबेरी

हिवाळी ऑलिम्पिकपटूंचाही पाठिंबा… –

दमित्रो पिड्रुशनी हा दोन हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला क्रीडापटू. यापैकी बीजिंगच्या हिवाळी स्पर्धेत त्याला पदकही मिळाले होते. पिड्रुशनीने युद्धात लढणाऱ्या लष्काराला पाठबळ देताना म्हटले आहे की, ‘‘खेळांचा राजकारणाशी संबंध नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यांचा अन्योन्य संबंध आहे. मातृभूमीसाठी रक्षणासाठी लढताना अनेक सैनिक आणि नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. पंरतु तरीही इंच इंच भूमी लढूया!’’ याचप्रमाणे दमित्रो मझुरशूक या हिवाळी ऑलिम्पिकपटूनेही पिड्रुशनीला पाठिंबा दिला आहे.

टेनिसपटू स्टॅखोवस्कीसुद्धा युद्धासाठी सज्ज…-

युक्रेनचा ३६ वर्षीय टेनिसपटू सर्जी स्टॅखोवस्की एकेकाळी जागतिक टेनिस क्रमवारीत ३१व्या क्रमांकावर होता. २०१३च्या विम्बल्डनमध्ये स्टॅखोवस्कीने रॉजन फेडररसारख्या नामांकित खेळाडूला नमवून लक्ष वेधले होते. पण या युद्धजन्य स्थितीत सैन्यदलातून लढण्याचा अनुभव नाही, म्हणून शांत का राहावे, असा नुसता प्रश्न उपस्थित न करता तो युद्धासाठी सज्ज झाला आहे. लढण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही नागरिकाने सैन्यात सामील होऊन हाती शस्त्र घ्यावे आणि देशाचे रक्षण करावे, हे सेनादलाचे आवाहन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले, असे स्टॅखोवस्कीने म्हटले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …