Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील गाड्यांच्या किमतीवरही होणार परिणाम! कार होऊ शकतात महाग


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होत आहे. भारतात पेट्रोल आणि वाहनांच्या किमती वाढताना दिसत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताच्या वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे. ऑटोमेकर फोक्सवॅगन, रेनॉल्ट आणि टायर निर्मात्या नोकिया टायर्ससह अनेक कंपन्यांनी शुक्रवारी युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर उत्पादन ऑपरेशन्स बंद करण्याची किंवा हलवण्याची योजना आखली आहे. या युद्धामुळे बाइक आणि कारही महाग होऊ शकतात, कारण या सर्व गोष्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘पॅलेडियम’ धातूचा सर्वात मोठा उत्पादक रशिया आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत होणार

तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की पॅलेडियमचा वापर पेट्रोल, वाहनांचे एक्झॉस्ट, दागिने, इलेक्ट्रिक उपकरणे, दंत उपचार आणि मोबाईल फोनमध्ये देखील केला जातो. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायूंचे परिणाम कमी करण्यासाठी वाहनांमध्ये पॅलेडियमचा वापर केला जातो. वाहन एक्झॉस्टमध्ये वापरलेले उत्प्रेरक कन्व्हर्टर पॅलेडियमपासून बनविलेले असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १ ग्रॅम पॅलेडियमची किंमत सुमारे ६,१८८ रुपये आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर त्याची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने वाहने महाग होऊ शकतात.

हेही वाचा :  जाणून घ्या मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम ​​कौशलबद्दल

(हे ही वाचा: Skoda Slavia ची नवी Sedan भारतात लॉंच! होंडा सिटीपेक्षाही स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

भारतात कार महागणार!

रशिया आणि युक्रेन अर्धसंवाहक तयार करतात तसेच महत्त्वाचे वायू आणि धातू तयार करतात. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाचा थेट परिणाम त्यांच्यावर झाला आहे. इलेक्ट्रिक कार आणि त्यांच्या बॅटरी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. या युद्धामुळे त्यांची पुरवठा साखळीही विस्कळीत होऊन भारतात गाड्या महाग होऊ शकतात.

(लाइव्ह अपडेट: Russia Ukraine War Live : युक्रेनमधला मोठा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात)

या युद्धामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढताना दिसत आहे. या युद्धामुळे भारतासह संपूर्ण जगात वाहनांच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसून येईल.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …