Tag Archives: Marathi News

अब्दुल सत्तारांची आमदाराकीच धोक्यात? गुन्हा दाखल झाल्याने अडचण वाढली

Abdul Sattar : कायमच वादात अडकत असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात ( election affidavit) खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयाने (Sillod court) दिले आहेत. अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचे मान्य …

Read More »

‘या’ गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: आपल्या संस्कृतीमुळे भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथल्या समृद्ध संस्कृतीकडे, कला आणि पोशाखाकडे परदेशी आकर्षित होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे. धोरा माफी गावाबद्दल जाणून घेऊया. जे उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील जवान …

Read More »

शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात …

Read More »

Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत …

Read More »

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे ‘ते’ कोण

Success Story : काही माणसं त्यांच्या कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, बोललं गेलं तरी ते कमीच वाटतं. या व्यक्ती आपल्या जीनकाळात अशी काही कामं करून जातात, की वर्षानुवर्षे, अनेक पिढ्यांना त्यांच्या या कार्याचा फायदा होतो. अनेकांची आयुष्य मार्गी लागतात. असंच अनेकांचे आशीर्वाद मिळवणारं एक नाव म्हणजे हसमुखलाल ठाकोरदास पारेख.  आजच्या घडीला 9 लाखांहून अधिक मार्केट कॅप (Market …

Read More »

Petrol-Diesel Price : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल, तुमच्या शहरातील दर काय?

Petrol Diesel Rate Today 12th July 2023 :  आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलावर देशातील पेट्रोल डिझेलचे दर ठरत असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वधारला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळपास आहे. त्यामुळे आज क्रूडच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील तेल वितरण कंपन्यांनी आजचे म्हणजे बुधवारचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दरं जाहीर केले आहे. …

Read More »

चप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. अशाच एका गोंदियाच्या तरुणीने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. गरीबीत जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या (Khushboo Baraiya) या 25 वर्षीय युवतीने स्पर्धा परीक्षेसाठी कोणतीही शिकवणी वर्ग न लावता गावात राहून नियमित अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत …

Read More »

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब थेट रुग्णालयात पोहोचलं; बाप लेकाचा मृत्यू

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक काढा (Ayurvedic extract) प्यायल्याने साताऱ्यात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्याच्या फलटणमध्ये (Phaltan) घडलाय.  फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. आयुर्वेदिक काढा प्यायल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच दोघांच्या मृत्यूचे कारण कळणार …

Read More »

मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) सातत्याने अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहे. एका मजुरावर भाजप (BJP) नेत्याने लघवी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका व्यक्तीला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात (Sagar) एका व्यक्तीला नग्न करुन काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी (MP Crime) अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा …

Read More »

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

Brain Eating Amoeba : केरळमधील (Kerala) अलप्पुझा येथे दूषित पाण्यात राहणाऱ्या अमिबामुळे (Amoeba) 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूला दुर्मीळ संसर्ग झाल्यानं केरळच्या अलप्पुझामध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. जवळपास आठवडाभर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. गुरुदत्त हा दहावीत शिकत होता. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (primary amoebic meningoencephalitis) संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला …

Read More »

‘नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध’; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

Newweds wife Shocked: लग्न बंधन हे पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच नवरा-बायकोने एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल माहिती घेणे योग्य ठरते. असे न केल्यास लग्नानंतर अचानक मोठे धक्के बसण्याची शक्यता असते. मुरादाबादच्या एका नववधूला इतका मोठा धक्का बसला की ती अजूनही त्यातून सावरु शकली नाही.  नववधूला आपला पती आणि सासरच्या मंडळींबद्दल फारशी माहिती नव्हती. नवऱ्याला सरकारी नोकरी आहे इतकी माहिती …

Read More »

“हा ते मीच तयार केले”; अग्नी क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानला देऊन प्रदीप कुरुलकर मारत होते फुशारक्या

Honey Trap Case : डीआरडीओचे (DRDO) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (dr pradeep kurulkar) यांच्याविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल केले आहे. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. एटीएसने (ATS) 30 जून रोजी विशेष न्यायालयात आपले आरोपपत्र …

Read More »

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, ‘मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की….’

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.  …

Read More »

BLOG : वारी आणि मी…! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव

विशाल सवने, झी मीडिया, पंढरपूर : Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय. वारीचं वार्तांकन करण्याचे माझं यंदाचं कितीवं वर्ष हे सांगणार नाही.  त्याचं एक कारण आहे;  मी वार्तांकन करताना एका आजीला विचारलं; “माऊली कितवी वारी”? माऊली म्हणाल्या, “भक्तीचा हिशोब ठेवायचा नसतो. …

Read More »

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 2.06 डॉलरने वाढून प्रति बॅरल 73.86 डॉलरने विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 1.95 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 78.47 डॉलरला विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती आज, 8 जुलै रोजी देशभरात जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही …

Read More »

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; ‘या’ राज्यांमध्ये जाणं टाळाच

Monsoon Alert Today: मान्सून यंदाच्या वर्षी अपेक्षेहून काहीसा उशिरानं भारतात पोहोचला पण आता मात्र त्यानं अतिशय वेगानं सारा देश व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं अनेकांचेच पर्यटनाचे (travel) बेतही फसले आहेत.  हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 7 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात …

Read More »

Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Man Becomes Crorepati: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास …

Read More »

क्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण

Crime News : बिहारच्या (Bihar Crime) समस्तीपूर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राने अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून नऊ तास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला …

Read More »

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे वादळ आलेलं राष्ट्रवादीमध्ये.  अजित पवारांचं …

Read More »

ट्विटरला टक्कर! मेटाचं Threads app लाँच; 11 वर्षांनंतर Zuckerberg चं ट्विट विक्रमी वेगानं व्हायरल

Mark Zuckerberg Threads : मोजणंही अशक्य होईल इतक्या मोठ्या पातळीवर असंख्य अॅप्स आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत. यापैकी काही अॅप्सनी युजर्सचा विश्वास जिंकण्यातही यश मिळवलं आहे. यामध्ये ट्विटर असो किंवा मग मेटाचे काही अॅप्स. ही नावं कायमच पुढे असतात. येत्या काळात याच नावांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळू शकते. कारण, एलॉन मस्कच्या ट्विटरला मार्क झुकरबर्ग आता थेट आव्हान देताना दिसणार …

Read More »