‘या’ गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: आपल्या संस्कृतीमुळे भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथल्या समृद्ध संस्कृतीकडे, कला आणि पोशाखाकडे परदेशी आकर्षित होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.

धोरा माफी गावाबद्दल जाणून घेऊया. जे उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील जवान ब्लॉकमध्ये आहे. हे गाव संस्कृती, खाद्यपदार्थ, कला आणि चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. 

लिम्का बुकमध्ये नाव 

आशियातील हे सर्वात सुशिक्षित गाव जगभर प्रसिद्ध आहे. केवळ 10-11 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील सुमारे 90 टक्के लोक साक्षर आहेत. एवढेच नाही तर २००२ मध्ये ढोरा माफी गावाचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये समाविष्ट करण्यात आले. 

त्यावेळी या गावाचा साक्षरता दर ७५ टक्क्यांहून अधिक होता, ज्याने विक्रम केला. त्याचबरोबर या गावाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठीही सर्वेक्षणासाठी निवड झाली.

मोठ्या शहरात सर्व सुविधा उपलब्ध 

धोरा माफी गावात पक्की घरे, 24 तास वीज आणि पाणी आणि अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालये आहेत. येथील रहिवासी शेती न करता करिअर म्हणून नोकरीची निवड करतात. येथे, संपूर्ण लोकसंख्येपैकी 90 टक्क्यांहून अधिक लोक साक्षर आहेत. गावातील जवळपास 80 टक्के लोक डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, आयएएस अधिकारी बनून गावाचे नाव लौकिक करत आहेत.

हेही वाचा :  जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु

अलिगड विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे गाव 

धोरा माफी हे गाव देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला लागून आहे. विद्यापीठातील बहुतांश प्राध्यापक आणि डॉक्टर याच गावात स्थायिक झाले आहेत. या गावातील रहिवाशांनी परदेशात जाऊन साक्षरता, कौशल्य आणि शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. विशेष म्हणजे ढोरा माफी गावात केवळ पुरुषच नाही तर महिलाही शिक्षित आणि स्वावलंबी आहेत. धोरा माफी गावातील बहुसंख्य लोक परदेशात राहत असल्याचे सांगितले जाते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …