IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद का झाली पराभूत? ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघ मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. तर नेमकी या पराभवामागे कोणती कारणे आहे, त्यावर एक नजर फिरवूया…

1. भुवनेश्वरचा तो नो बॉल : सनरायजर्स गोलंदाजी करताना पहिल्यात षटकात भुवनेश्वरने दमदार गोलंदाजी केली.यावेळी त्याने केवळ एकच रन दिला. पण राजस्थानचा तगडा खेळाडू जोस बटलरला या ओव्हरमध्ये त्याने बाद केलं. पण तोच बॉल नो बॉल पडल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं नाही. त्यामुळे हैदराबादला मोठा तोटा झाला

2. हैदराबादचे फिरकीपटू फ्लॉप : वॉशिंग्टन सुंदर सनरायजर्सचा मुख्य फिरकीपटू असून तो कालच्या सामन्यात खास गोलंदाजी करु शकला नाही. त्याने तीन ओव्हरमध्ये एकूण 47 रन दिले. याउलट दुसरीकडे राजस्थानचे स्पिनर चहल आणि आश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

3. राजस्थानची दमदार फलंदाजी : सामन्यात हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सर्वांनी आपआपल्यापरीने योगदान देत संघाला 200 पार पोहोचवलं. यात  जॉस बटलरने 35, यशस्वी जैस्वालने 20, संजू सॅमसनने 55, देवदत्त पड्डीकलने (41) आणि शिमरोन हेटमायरने 32 धावा केल्या. ज्यामुळे राजस्थानने 210 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

4. एडन मार्करमला वर खेळायला न पाठवणे : सनरायजर्सचा कर्णधार केन विलियमसनने एडन मार्करला पाचव्या क्रमांकावर खेळवले. त्याने संघासाठी नाबाद 57 धावा केल्या. पण तेच त्याला वरच्या फळीत खेळवले असते तर त्यानेकाही अधिक धावा धावफलकावर लावल्या असत्या

5. केन विल्यमसनचा ‘तो’ झेल : हैदराबादचा कर्णधार अवघ्या 2 धावांवर असताना पहिल्याच ओव्हरमध्ये स्लीपमध्ये झेलबाद झाला. पण ही कॅच देवदत्त पड्डीकलच्या हातात जाताना काहीशी मैदानात लागल्या सारखं दिसत होतं. पण तरीदेखील विल्यमसना बाद करार देण्यात आल्याने हैदराबाद फॅन्स नाराज होते.

हे देखील वाचा-

RCB vs KKR : कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यात कशी असेल रणनीती, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

IPL 2022: ‘आरसीबीने मला विचारलेही नाही…’ युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध

IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  सेमीफायनसाठी कशी असणार भारताची प्लेईंग 11? ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला संधी मिळणार?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …