Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत नाहीत. पण, याच पदार्थांची चव घेताना किंवा सहज तुम्हाला कधी एक प्रश्न पडला आहे का? की हे अंड आधी तयार झालं की आधी कोंबडी या जगात आली? 

लहानपणापासून तुम्हालाही अनेकदा हा प्रश्न पडला असेल आणि त्यानंतर त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हीच विविध पद्धतींनी कयासही लावला असेल. पण हाती मात्र निराशाच लागली. कारण, याचं उत्तर शोधणं भल्याभल्यांना जमलं नाही. थोडक्यात काय? तर सर्व प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या Google पासून तज्ज्ञ मंडळींपर्यंत सर्वजण या एका लगानशा प्रश्नापुढं अपयशी ठरले. 

हेही वाचा :  Sharaddha Walkar Murder Case : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले, प्रत्येक खूनी मनोरूग्ण असतो का?

अखेर मिळालं या प्रश्नाचं उत्तर… 

संपूर्ण जग या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यात गुंतलेलं असतानाच ब्रिटनच्या शेफील्ड आणि वारविक विद्यापीठातील संशोधकांनी आधी कोण आलं, कोंबडी, की अंड? या प्रश्नाचं उत्तर जवळपास शोधलं आहे. या संशोधनानुसार अंड्याच्या कवचाच्या निर्मितीसाठी ओवोक्लिडिन (OC-17) नावाच्या घटकाची गरज भासते. कोंबडीच्या अंडाशयात त्याची निर्मिती होते त्यामुळं या कोड्याचं उत्तर आहे की, पृथ्वीवर पहिली कोंबडीच आली. 

कशी असते प्रक्रिया? 

अंड्याचं कवच नेमकं कसं तयार होतं याचं निरीक्षण करण्यासाठी संशोधकांनी HECToR या आधुनिक संगणकाचा वापर केला. ज्या माध्यमातून OC-17 एका उत्प्रेरकाप्रमाणं काम करतं आणि कोंबडीच्या शरीरात कॅल्साईट क्रिस्टलमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा पुरवठा सुरु करतो, ज्यामुळं अंड्याच्या आत पोकळी तयार होऊन त्यातच कोंबडीचं पिल्लू वाढतं ही बाब समोर आली. 

कोंबडी आधी की अंड याविषयीचा आणखी एक सिद्धांत… 

आणखी एका निरीक्षणानुसार आणि शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार जगात सर्वप्रथम अंड नव्हे तर कोंबडी किंवा कोंबड्याचाच जन्म झाला होता. हजारो वर्षांपूर्वी कोंबडा आणि कोंबडी यांचं आज जे रूप आहे ते तसे दिसतच नव्हते. किंबहुना कोंबडी अंडही देत नव्हती.  तर, ती त्या काळात पिलांना जन्म देत होती. पण, पुढे कोंबडीच्या शारीरिक रचनेत आजुबाजूच्या बदलांनुसार काही बदल होत गेले आणि अंड देण्याची क्षमता विकसित झाली. ज्यामुळं या जगात सर्वप्रथम अंड नव्हे तर कोंबडा आणि कोंबडी आली हेच सिद्ध होतं. 

हेही वाचा :  या अ‍ॅपवर LPG Cylinder बुक केल्यास मिळेल कॅशबॅक, पाहा बुकिंगची संपूर्ण प्रक्रियाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …