Tag Archives: manoranjan News in Marathi

दोन मुली, १६ वर्षांचा संसार, जाणून घ्या का मोडलं फरहान अख्तरचं पहिलं लग्न

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. फरहान अख्तर आणि शिबानी एकमेकांना मागच्या ४ वर्षांपासून डेट करत आहेत आणि आज दोघंही लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खंडाळा येथील फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी सप्तपदी घेणार आहे. या विवाह सोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. दरम्यान …

Read More »

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी माहीम पोलिसांना दिले. चित्रपटातील अल्पवयीन मुलांवर चित्रित केलेल्या आक्षेपार्ह दृश्यांवरून भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अ‍ॅड्. प्रकाश …

Read More »

Video: मध्यरात्री विमानतळावरच चक्क डान्स करु लागली समांथा रुथ प्रभू

समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुरुवातीला ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केले त्यामुळे ती चर्चेत होती. आता समांथाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. समांथा …

Read More »

“देवेंद्रजी खूप चांगला डोसा बनवतात, मोलकरीन आली नाही तर…”; अमृता फडणवीसांनी केला खुलासा

अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी …

Read More »

Bappi Lahiri Funeral: बप्पी लहरी यांच पार्थिव पंचत्त्वात विलीन, जुहू स्मशानभूमीत पार पडले अंत्य संस्कार

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी १६ फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर आज १७ फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर जुहूमधील पवन हंस स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बप्पा लहरी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. बप्पी लहरी …

Read More »

कंगनाला करण जोहराला टाकायचे ‘लॉक अप जेल’मध्ये, म्हणाली ‘इंडस्ट्रीमध्ये असे अनेक…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे. आता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. तिच्या शोचे नाव आहे ‘लॉक अप.’ या शोमध्ये ती इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींना लॉकअप ठेवणार आहे. कंगनाने आता बॉलिवूडमधील अतिशय …

Read More »

Gangubai Kathiawadi : अभिनेता विजय राजची व्यक्तिरेखा वादाच्या भोवऱ्यात, वाचा नेमकं काय घडलंय

चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’मधील अभिनेता विजय राजच्या भूमिकेची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला दिसत आहे. सुरुवातीला काही लोकांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला. त्यानंतर आलियाच्या कास्टिंगवर आणि आता या चित्रपटात अभिनेता विजय राजनं साकारलेल्या तृतीयपंथी महिलेच्या भूमिकेवरुन नवा वाद सुरू झाला …

Read More »

दीप सिद्धूच्या निधानाच्या काही तास आधीच गर्लफ्रेंडनं शेअर केली होती स्पेशल पोस्ट

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनाच्या काही तासांपूर्वी दिप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. पण आता त्याच्या अशा अचानक झालेल्या निधनानं त्याची गर्लफ्रेंड रीनालाही मोठा धक्का बसला आहे. दीप सिद्धूचा अपघात होण्याच्या काही तास अगोदरच रीनानं तिच्या …

Read More »

फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? बप्पी लहरींच्या गणपतीच्या चेनने केले होते मायकल जॅक्सनला आकर्षित

बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ वर्षी मुंबईत निधन झालं. प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं ६९ वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. पण एकदा बप्पी लहरी यांच्यामुळे भारतीय संगीतसृष्टीत एका नव्या कौशल्याची भर पडली होती. त्यांच्या पॉप …

Read More »

Bappi Lahiri Dies: निधनापूर्वीच्या बप्पीदांच्या शेवटच्या पोस्टमध्येही होता Gold चा उल्लेख; म्हणाले होते…

इन्स्टाग्रामवरील बप्पी लहरींच्या याच पोस्टवर आता अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची …

Read More »

Bappi Lahiri: बप्पी लहरींकडे नक्की किती सोनं होतं?; मालमत्तेबद्दल स्वत:च केलेला खुलासा

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनावर घर करून बसलेल्या बप्पी दाची ही बातमी ऐकून सगळ्यांचेच डोळे डोळे पाणावले आहेत. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल …

Read More »

“माझी आई सामाजिक कार्यकर्ती होती, चित्रपटात तिला वेश्या बनवलं”; गंगुबाई काठियावाडीवरून मुलाची प्रतिक्रिया

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अजय देवगणही आहे. मात्र गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून वकिलाचे कुटुंबीयांना धक्का बसला आहे, असे गंगूबाई यांच्या …

Read More »

गोष्ट पडद्यामागची २१: मनमोहन देसाई… गिरगावातील क्रिकेटवेडा दिग्दर्शक!

सिनेमाचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. February 15, 2022 12:13:09 pm दिवंगत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३७ साली एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील, किकूभाई देसाई हे भारतीय चित्रपट निर्माते आणि पॅरामाउंट सिनेमाचे मालक होते. मनमोहन देसाई हे त्यांच्या कौटुंबिक, अॅक्शन, गाणी आणि डान्सचा मसाला …

Read More »

‘गहराइयां’मध्ये सातत्यानं का झाला ‘F- वर्ड’चा वापर? लेखकाच्या वडिलांनी दिलं उत्तर

‘गहराइयां’चे लेखक सुमित रॉयच्या वडिलांनी चित्रपटात वापरलेल्या ‘त्या’ शब्दाच्या वापरावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. अभिनेत्री दीपिकापासून ते दिग्दर्शक शकुन बत्रापर्यंत सर्वांनीच या चित्रपटाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. …

Read More »

श्रीराम नेनेंनी माधुरी दीक्षितसोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

माधुरी ही सिनेसृष्टीत तितकीशी सक्रीय नसली तरी ती कायमच चर्चेत असते. आपल्या अभिनय कौशल्याने आणि नृत्याच्या जोरावर अनेकांच्या मनावर जादू करणारी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी आज बॉलिवूडमध्ये ‘धकधक’ गर्ल म्हणून ओळखली जाते. माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबत सध्या तिने अनेक डान्स शो चे परिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. माधुरी ही सिनेसृष्टीत तितकीशी सक्रीय …

Read More »

“काल मी दोन वर्षांनी…”, सुशांतच्या निधनानंतर कामावर परतलेल्या रिया चक्रवर्तीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधित ड्रग्ज प्रकरणी अडकल्यानंतर रियाला अटक झाली होती. रिया चक्रवर्ती ही सध्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुन्हा तिच्या कामांना सुरुवात केली आहे. सुशांतच्या निधनानंतर २ वर्षांनी रिया चक्रवती ही कामावर परतली …

Read More »

‘या’ सुंदर व्हिलामध्ये झालंय दीपिकाच्या ‘गहराइयां’चं शूटिंग, एका रात्रीचं भाडं किती आहे माहितीये का?

अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचा बहुचर्चित चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनन्या पांडे, धैर्य कारवा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटासोबतच त्यातील सुंदर लोकेशन्सची देखील तेवढीच चर्चा होताना दिसते. …

Read More »

राज कुंद्रानंतर आता शिल्पा व शमिता शेट्टीही अडचणीत; आईसह दोघींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार असं दिसतंय. मुंबईतील अंधेरी कोर्टाने शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. यासोबतच न्यायालयाने तिघांनाही २८ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण २१ लाखांच्या कर्जाशी संबंधित आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील अंधेरी कोर्टाने एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर …

Read More »

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. …

Read More »

“मला तुझा…”, दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रणवीरने शेअर केलेला हा फोटो पाहून दीपिकाच्या ‘गहराइयां’ चित्रपटातील बोल्ड सीनची पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गहराइयां’ चित्रपट ११ फेब्रुवारीला ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता रणवीर …

Read More »