Breaking News
  • ‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले ‘तुझी आता…’
  • कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक
  • ‘पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत…’, 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे
  • KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड
  • ‘अजिबात खपवून घेणार नाही’; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

कंगनाला करण जोहराला टाकायचे ‘लॉक अप जेल’मध्ये, म्हणाली ‘इंडस्ट्रीमध्ये असे अनेक…’


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे. आता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. तिच्या शोचे नाव आहे ‘लॉक अप.’ या शोमध्ये ती इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींना लॉकअप ठेवणार आहे. कंगनाने आता बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरला लॉकअप जेलमध्ये टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगनाचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो चर्चेत आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ती करण जोहरला जवळचा मित्र असे बोलताना दिसत आहे आणि त्याला लॉक अप जेलमध्ये टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
PHOTOS: रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दीप सिद्धूच्या प्रेयसीला पाहिलंत का?; कठीण काळात नेहमी होती सोबत

‘फिल्म इंडस्ट्रीमधील असे खूप लोक आहे ज्यांना लॉक अपमध्ये टाकू इच्छिते. माझ्या लॉक अपमध्ये माझी आवडती स्टार कास्ट असणार आहे… सर्वात आधी तर माझा जवळचा मित्र करण जोहर आणि नंतर एकता कपूर’ असे कंगना म्हणाली.

हेही वाचा :  “हॅलो मित्रा…”; ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापला अभिषेक बच्चन

कंगानाचे बोलणे ऐकून एकता कपूरला हसू अनावर होते. ती म्हणाली, ‘मी आणि करण आत बसून खाण्याविषयी गप्पा मारु… त्यानंतर कंगनाला देखील आत बोलवू आणि तिघे मिळून काही तरी पदार्थ खाऊ.’

कंगनाच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या शो विषयी बोलताना कंगना म्हणाली होती की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून ओटीटीसाठी काही करावे असा विचार करत होते. पण या शो विषयी नेमकं काय करावे हे मी काही ठरवले नव्हते. जेव्हा मला एकता कपूरचा फोन आला आणि तिने मला याबाबत माहिती दिली तेव्हा मला तो प्रचंड आवडला. त्यानंतर तो मी करण्याचा निर्णय घेतला.’

The post कंगनाला करण जोहराला टाकायचे ‘लॉक अप जेल’मध्ये, म्हणाली ‘इंडस्ट्रीमध्ये असे अनेक…’ appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …