Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीसाठी एक वाईट बातमी आली आहे. 80 आणि 90 च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करणारे संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे बुधवारी मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी दा यांच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाला वाटत होते की काश ही बातमी खोटी असावी. मात्र त्यांच्या मृत्यूची पुष्टी होताच चित्रपटसृष्टीपासून चाहत्यांपर्यंत सर्वत्र एक शांतता पसरली. बप्पी दा यांनी 1970-80 च्या दशकात ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘शराबी’ सारख्या चित्रपटांसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ‘भंकस’ हे 2020 मध्ये आलेल्या ‘बागी 3’ चित्रपटासाठी होते. क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी सांगितले की, बप्पी लहरी गेल्या एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया किंवा ओएएसमुळे त्यांचा मृत्यू झाला. लहरी यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्याचा सर्वाधिक धोका कोणाला आहे हे या लेखातून जाणून घेऊया.

हेही वाचा :  जोडीदाराच्या आवडत्या रंगावरुन ओळखा त्याचे व्यक्तिमत्व आणि काही मजेदार गोष्टी

Obstructive Sleep Apnea म्हणजे काय?

obstructive-sleep-apnea-

मेयो क्लिनिकच्या मते, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा झोपेशी संबंधित श्वसनाचा विकार आहे. त्यामुळे रुग्णाला झोपेत असताना श्वास घेण्यास त्रास होतो. स्लीप एपनियाचे अनेक प्रकार आहेत, परंतु सर्वात सामान्य म्हणजे ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया आहे. झोपेत असताना जेव्हा तुमच्या घशातील स्नायू अधूनमधून आराम करतात आणि तुमच्या श्वसनलिकांना अवरोधित करतात किंवा त्यात अडथळा आणतात तेव्हा या प्रकारचा श्वसनविकार होतो. ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे घोरणे हे आहे.

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

Obstructive Sleep Apnea ची लक्षणे काय?

obstructive-sleep-apnea-

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचे संकेत आणि लक्षणे म्हणजे दिवसा खूप झोप येणे, जोरात घोरणे, झोपेत असताना श्वास थांबणे, गुदमरून किंवा धाप लागल्यामुळे अचानक जाग येणे, तोंड कोरडे पडणे, घसा खवखवणे, सकाळी डोकेदुखी जाणवणे, दिवसा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, सतत मूड बदलणे जसे की नैराश्य किंवा चिडचिडेपणा आणि ब्लड प्रेशर वाढणे इत्यादी लक्षणांचा समावेश आहे.

(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)

Obstructive Sleep Apnea चा जास्त धोका कोणाला आहे?

obstructive-sleep-apnea-

हा आजार कोणालाही होऊ शकतो, परंतु काही असे घटक आहेत ज्यामुळे त्याचा धोका अधिक वाढू शकतो. डॉक्टर सहमत आहेत की लठ्ठपणा असलेले लोक, वृद्ध, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, क्रोनिक नेजल कंजेशन, मधुमेह, धूम्रपान करणारे लोक आणि कौटुंबिक इतिहास अर्थात अनुवांशिकता असलेल्या लोकांना याचा जास्त धोका असतो.

हेही वाचा :  Covid 4th wave: आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'या' महिन्यात येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ही 14 लक्षणं घालणार धुमाकूळ..!

(वाचा :- Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!)

डॉक्टरांकडे कधी जावे?

जर तुम्हाला वरील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीतरी घोरणे सामान्य आहे परंतु जर तुम्ही नेहमी घोरत असाल आणि त्यामुळे इतरांच्या झोपेत अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवले पाहिजे. जर तुम्ही नेहमी धाप लागलेल्या अवस्थेत जागे होत असाल, झोपेत गुदमरल्यासारखे वाटत असेल किंवा झोपेच्या दरम्यान श्वास थांबल्यासारखा वाटत असेल तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय दिवसभरात काम करताना, टीव्ही पाहताना किंवा वाहन चालवताना जास्त झोप येत असेल तर हा आजार झाल्याची लक्षणे आहेत.

(वाचा :- Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!)

स्लीप एपनियावर उपाय काय?

स्लीप एपनियाच्या पारंपारिक उपचारांमध्ये रात्री CPAP मास्क घालणे समाविष्ट आहे. पण काही लोकांना हा मास्क लावून झोपणं सोयीस्कर वाटत नाही. या लोकांनी आपल्या रोजच्या सवयी बदलल्या पाहिजेत. यामध्ये पहिला क्रमांक येतो तो तुमचे वजन नियंत्रित करण्याचा. दररोज योगासने करा आणि शक्य असल्यास दररोज अर्धा तास चालत जा. झोपण्याची स्थिती आणि मुद्रा बदलू शकतात. दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा. त्यानंतरही तुम्हाला आराम वाटत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण स्लीप एपनियाचं निदान वेळीच झालं नाही तर इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवणे, दिवसभर सुस्ती जाणवणे, मानसिक समस्या, पचन नीट न होणे, स्मरणशक्तीवर परिणाम, बद्धकोष्ठता, तसेच हृदय फेल्युर स्थितीसारखी परिस्थिती निर्माण होणे हे सुद्धा असू शकते.

हेही वाचा :  Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं

(वाचा :- COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून …

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. …