Ayurvedic herbs : झोपण्याआधी रूममध्ये जाळा ‘या’ वनस्पतीची 4 पानं, डायबिटीज, अनिद्रा, हृदयरोग, लो इम्युनिटीसारखे 6 आजार होतील मुळासकट दूर!

पृथ्वीवर हजारो वनस्पती आहेत ज्यात विविध औषधी गुणधर्म आहेत आणि त्यांचा वापर अनेक औषधे आणि पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. प्रचंड आणि असंख्य गुणधर्मांनी भरलेली अशीच एक वनस्पती म्हणजे तमालपत्र (Bay leaf). ही हलकी हिरवी पाने स्वयंपाकासाठी वापरली जातात. ही पाने जेवणाची चव तर वाढवतातच पण त्यातील पोषक तत्त्वे वाढवण्याचेही काम करतात. तमालपत्राचे फायदे (Bay leaf benefits) असे आहेत की त्यात अ‍ॅंटी-बैक्टीरियल आणि अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि म्हणूनच ते शतकानुशतके नैसर्गिक औषधांमध्ये वापरले जात आहेत. तमालपत्र लॉरेल वनस्पतीपासून येतात जे की एक सदाहरित झुडूप आहे.

या औषधी वनस्पतीची पाने आणि तेल याचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदानुसार तमालपत्राचे गुणधर्म किंवा प्रकृती गरम असते आणि म्हणून ते कफ आणि वात दोषांना शांत करते तर ते पित्त दोष वाढवते. WebMD च्या मते, तमालपत्राचा वापर मधुमेह, कर्करोग, पोटाच्या समस्या, वेदना आणि इतर अनेक परिस्थितींसाठी केला जाऊ शकतो. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की तमालपत्रापासून बनवलेला चहा प्यायल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते. असेही मानले जाते की ते खाण्यासोबतच जाळल्याने आणि त्याचा सुगंध घेतल्याने अनेक रोग दूर होतात. कसे ते जाणून घेऊया. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

निद्रानाशाची समस्या होते दूर

झोप न लागणे म्हणजे निद्रानाश हा एक गंभीर आजार आहे. तमालपत्र शरीराला आराम देण्यास मदत करते. ते निद्रानाशाचा सामना करण्यासाठी प्रभावी आहेत कारण ते तुमच्या मेंदूचे कार्य शांत करतात. झोपण्यापूर्वी, आपल्या खोलीत चार तमालपत्र जाळून टाका किंवा पाण्यात तमालपत्र घालून ते पाणी झोपण्यापूर्वी प्या. यामुळे शांत व गाढ झोप लागण्यास मदत होईल.

(वाचा :- Ayurveda Tips : दही खाताना विसरूनही करू नका ‘या’ 6 चूका, आयुर्वेदाने घातलीये पूर्ण बंदी कारण…!)

डायबिटीजसाठी रामबाण

तमालपत्र खाल्ल्याने तुमची साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे आणि इन्सुलिनच्या उत्पादनात मदत करते. अशाप्रकारे ते टाइप 2 मधुमेहाचा सामना करण्यासाठी प्रभावी आहे.

(वाचा :- Weight loss Mistake : वेटलॉस करत असाल तर सावधान, 141 किलो वेटलॉस करणं पडलं महागात, एक-एक करून सर्व अवयव झाले निकामी!)

चिंता दूर करून डोकं शांत करतं

तमालपत्रामध्ये लिनालूल (linalool) असते. हे कंपाऊंड चिंता किंवा स्ट्रेसवर उपचार म्हणून ओळखले जाते. फक्त 10 मिनिटे तमालपत्राचा वास घेतल्याने तुम्हाला लगेचच बरे वाटू शकते. मन शांत करण्याचेही काम तमालपत्र करते.

हेही वाचा :  राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

(वाचा :- Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!)

हृदयरोगापासून बचाव होतो

तमालपत्रामध्ये रुटिन आणि कॅफीक ऍसिड सारखी संयुगे असतात, जी हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही संयुगे हृदयाच्या भिंती मजबूत करून हृदयाशी संबंधित समस्या दूर ठेवतात आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)

इम्युनिटी पॉवर होते मजबूत

तमालपत्रात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते. यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ए देखील असते, जे तुमचे डोळे, नाक, घसा आणि पचनसंस्थेसाठी चांगले असतात. तमालपत्र पोटाचे गंभीर विकार किंवा सीलिएक रोगांना हाताळण्यासाठी देखील खूप प्रभावी ठरू शकते.

(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)

डॅंड्रफ होतो दूर

आपले केस नियमित शॅम्पूने धुवा. नंतर तमालपत्र थंड पाण्यात मिक्स करून त्याने केस धुवा. वैकल्पिकरित्या तुम्ही तमालपत्राचे असेंशियल ऑइल देखील लावू शकता. यासाठी तुमच्या शॅम्पूमध्ये तेलाचे काही थेंब मिसळा आणि स्कॅल्पला म्हणजेच टाळूला चांगला मसाज करा. नंतर केस पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि डॅंड्रफला बाय बाय करा.

हेही वाचा :  Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात 'ही' लक्षणे, लगेच करा चेकअप!

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर …

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी …