Brain Hemorrhage : नव-याने मारल्यामुळे या मॉडेलला झाला ब्रेन हॅमरेज, झाली अशी विचित्र हालत, जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे व उपाय!

आपल्या विचित्र कारवायांमुळे चर्चेत असलेली पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ (Lock Upp) शोमध्ये आहे आणि या कार्यक्रमा दरम्यान तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. होस्ट कंगना राणावतशी बोलताना तिने आपल्या लग्नाबद्दल आणि माजी पती सॅम बॉम्बे बद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. पूनमने सांगितले की, सॅम मला खूप मारायचा. त्याने मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तो मला एकाच खोलीत डांबून ठेवायचा. तो मला बागेत किंवा घराच्या गच्चीवरही जाऊ देत नव्हता. मला माझा फोन कुठेही नेण्याची परवानगी नव्हती. तो मला कधीतरीच नाही तर दररोज मारायचा.

तो मला एकाच ठिकाणी वारंवार मारत राहिला त्यामुळे एक वेळ अशी आली जेव्हा मला ब्रेन हॅमरेज झाला. पूनम म्हणाली की, माझ्या मेंदूची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. ते लपवण्यासाठी मी मेकअप ग्लॉस लावायचे आणि सगळ्यांसमोर हसायचे. मी सगळ्यांसमोर मस्त वागत असे. तो सकाळी दहा वाजता दारू प्यायला सुरूवात करायचा आणि रात्रीपर्यंत दारूच पित बसायचा. सर्व कर्मचारी घाबरले असल्याने मला वाचवण्यासाठी कोणीही आजूबाजूला फिरकतही नसे. (फोटो साभार: istock by getty images) TOI)

हेही वाचा :  Potatoes Quality check : सावधान, कधीच खरेदी करू नका या रंगाचे बटाटे, असू शकतात विषारी, एक्सपर्ट्सनी सांगितली महत्त्वाची माहिती..!

ब्रेन हॅमरेज काय आहे?

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे. याला ब्रेन ब्लीड किंवा इंट्राक्रॅनियल हेमरेज असेही म्हणतात. ही एक आपत्कालीन स्थिती आहे ज्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत. जेव्हा काही कारणाने मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला भागात अचानक रक्त वाहू लागते तेव्हा असे घडते.

(वाचा :- Ghee benefits : आयुर्वेद एक्सपर्ट्सचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ 1 पदार्थ, आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडतील व झटपट होईल वेटलॉस!)

ब्रेन हॅमरेजची कारणे

  1. डोक्याला दुखापत
  2. हाय ब्लड प्रेशर
  3. रक्तवाहिन्यांचे विकार
  4. रक्तस्त्रावाचे विकार
  5. लिव्हरचे आजार
  6. ब्रेन ट्यूमर
  7. बेकायदेशीर औषधांचे सेवन

(वाचा :- Quick Weight loss : आळशी आहात पण झटपट वेटलॉस करायचंय? झोपूनच करा ‘ही’ 5 साधीसोपी कामं, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीराची चरबी!)

ब्रेन हॅमरेजचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

ब्रेन हॅमरेजचे परिणाम वेगवेगळ्या वयोगटांनुसार वेगवेगळे असतात किंवा बदलतात. ब्रेन हॅमरेज द्ध लोकांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. मुलांमध्ये ही समस्या नसांमध्ये अचानक गडबड झाल्यामुळे होऊ शकते. इतर संभाव्य कारणांमध्ये रक्ताचे आजार, मेंदूतील गाठी, सेप्टिसीमिया, अल्कोहोल किंवा बेकायदेशीर औषधांचे अतिसेवन यांचा समावेश होतो.

हेही वाचा :  'हे फार चुकीचं...', मुलगा पार्थ पवार गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याने अजित पवार नाराज; 'पक्षातून काढून...'

(वाचा :- Stretching Exercise : दिवसभर एका जागी बसून डॅमेज होतात शरीरातील सर्व नसा, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितल्या 10 मिनिटांच्या ‘या’ 8 एक्सरसाइज!)

ब्रेन हॅमरेजची लक्षणे

ब्रेन हॅमरेजमुळे विविध लक्षणे उद्भवू शकतात. या लक्षणांमध्ये अचानक अंग थरथरणे, अशक्तपणा येणे, बधीरपणा येणे, चेहरा, हात किंवा पायात अर्धांगवायू होणे यांचा समावेश असू शकतो. त्याच्या इतर लक्षणांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत –

  1. अचानक व तीव्र डोकेदुखी
  2. गिळण्यात अडचण येणे
  3. दृष्टीच्या समस्या
  4. संतुलन बिघडणे
  5. समजण्यात अडचण येणे
  6. बोलण्यात अडचण येणे
  7. सुस्ती किंवा बेशुद्ध होणे

(वाचा :- पुरुषांनो, ‘या’ 1 हार्मोनच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, संभोगातील नावड, बाबा न बनणं, वेळेआधी म्हातारपण या समस्यांना पडाल बळी, झोपण्याआधी खा हे 7 पदार्थ!)

ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी उपाय

ब्रेन हॅमरेज टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्ट्रोकची कारणे उद्भवू न देणे. जीवनशैलीतील बदलांसह इतर खबरदारी घेतल्यास ब्रेन स्ट्रोक टाळता येतो. स्ट्रोक टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.

  1. संतुलित आणि सकस आहार घ्या.
  2. वजन नियंत्रित ठेवा.
  3. रोज व्यायाम करा.
  4. धूम्रपान करू नका आणि तंबाखूचे सेवन करू नका.
  5. मद्यपान कमी प्रमाणात करा.
  6. कोलेस्टेरॉल वाढू देऊ नका.
  7. रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
  8. मधुमेह होऊ देऊ नका.
  9. निद्रानाश असल्यास उपचार घ्या.
  10. संतुलित आणि निरोगी खाणे म्हणजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, बदाम, धान्ये, बिया यांचा अन्नामध्ये समावेश करणे.
  11. लाल मांस खाऊ नका
  12. कोलेस्टेरॉल आणि संतृप्त चरबी असलेले अन्न खाऊ नका.
  13. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणात कमी प्रमाणात मीठ वापरा.
  14. तुम्हाला वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास लगेच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
हेही वाचा :  सकाळच्या काळ्या चहाने केस धुतले तर मिळेल अशी चमक की व्हाल आश्चर्यचकीत

(वाचा :- Cancer diet: योग्य पद्धतीने खा ‘हे’ 6 अँटी-कॅन्सर पदार्थ, पहिल्याच स्टेजमध्ये टळेल कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …