Tag Archives: manoranjan News in Marathi

‘चला हवा येऊ द्या’ शो मधून ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता घेणार ब्रेक, समोर आले कारण

मात्र या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीर हा ब्रेक घेण्याची शक्यता आहे. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मात्र या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीर …

Read More »

“आठवणींसाठी धन्यवाद”; रणवीर सिंगपासून शिल्पा शेट्टीपर्यंत शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलीवूडने व्यक्त केला शोक

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. शेनच्या व्यवस्थापन संघाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत तो कोह सामुई, थायलंड येथील त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध पडला असल्याचे सांगितले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. शेनच्या मृत्यूच्या वृत्ताने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांना विश्वास …

Read More »

“देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी…”, मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणची पहिली पोस्ट

आदित्य नारायणची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. आदित्यने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी श्वेता अग्रवालने मुलीला जन्म दिला आहे. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पण आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो नाही तर त्याचा आणि श्वेताचा …

Read More »

“टायगर नेहमीच तयार असतो…”, सलमान खान आणि कतरिनाचा बहुचर्चित Tiger 3 चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ यांच्या चित्रपटाचा टीझर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने स्वत: या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याद्वारे त्यांनी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीखही सांगितली आहे. सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन …

Read More »

हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

सबा आझादनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सबा आझादसोबत त्याच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. याशिवाय हे दोघंही एकमेकांसाठी सोशल मीडियावरही पोस्ट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच हृतिकनं सबासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता आजारी असलेल्या सबाची …

Read More »

“अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

किशोर कदमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष या चित्रपटावरून लागून होतं. अमिताभ यांनी पंत्याहत्तरी ओलांडली असली तरी देखील ते एका तरुण कलाकारासारखे काम करताना दिसतात. अमिताभ यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्यांनी अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं. त्यापैकी …

Read More »

‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बरेच चर्चेत आहेत. मराठी चित्रपट सृष्टी आणि राज ठाकरे यांचं तसं फार जुनं नातं आहे. पण आता त्यांनी मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिलाय. राज ठाकरे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडिओमधील राज ठाकरे यांच्या दमदार आवाजानं सर्वांची मनं जिंकली …

Read More »

आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’ नागराज मंजुळेंची स्तुती करत; म्हणाला…

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं ‘झुंड’ आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हा चित्रपट पाहिला आहे. आता त्यावर धनुषने …

Read More »

“आज माझी लहान बिट्टो…”, शाहिद कपूरने शेअर केला लहान बहिणीच्या लग्नातील खास फोटो

शाहिद कपूरने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शाहिद त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहीदची बहिणी सनाह कपूर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सनहा ही अभिनेता पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत शाहिदने …

Read More »

“वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलेमागे एक कथा असते पण…”, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भावूक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतंच संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कामाठीपुरामध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी …

Read More »

“जे परिधान केलं आहेस ते पण…”, ब्रालेस फोटोमुळे बिग बॉस फेम निक्की तांबोळी झाली ट्रोल

निक्की तांबोळीने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निक्की सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे निक्कीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले …

Read More »

महाशिवरात्रीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे भिडे मास्तर ट्रोल, उत्तर देताना म्हणाले “आम्हा कलाकारांसाठी प्रेक्षक हेच…”

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेत भिडे मास्तरची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. पण नुकतंच मंदार चांदवडकर यांना एका पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र मंदार यांनी नुकतंच त्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. मंदार …

Read More »

“हा माझ्या आयुष्यातील…”, आकाश थोसरने केला आमिर खानसोबतचा तो व्हिडीओ शेअर

आकाश थोसरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेता आकाश थोसर हा सैराट या चित्रपटामुळे प्रेकाश झोतात आला. आकाश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. लवकरच आकाश अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आकाश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर आमिर खानसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. …

Read More »

अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत! पूर्ण केली आईची अपुरी इच्छा

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता लोखंडे डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. पण आता ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये या दोघांनीही पुन्हा लग्न केलं आहे. यासोबतच अंकितानं तिच्या आईची अपुरी इच्छा देखील पूर्ण …

Read More »

Chamma Chamma गाण्यात उर्मिलाने मातोंडकरने घातले होते, १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ या गाण्यामुळे उर्मिला चर्चेत आली होती. झी टिव्हीच्या रिअॅलिटी शो ‘सा रे ग म पा’मध्ये हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांनी गाणी गायली त्यानंतर अनन्या नावाच्या स्पर्धकाने ‘छम्मा-छम्मा’ गाणं गायलं. हे ऐकल्यानंतर उर्मिलाच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या या विषयीचा एक धक्कादायक किस्सा शेअर केला …

Read More »

“तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो…”, ‘ती परत आलीये’ मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सध्या ते ‘छुमंतर’ या विनोदी नाटकात काम करत आहे. झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘ती परत आलीये.’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून देवेंद्र सरदार यांना ओळखले जाते. देवेंद्र सरदार यांनी या मालिकेत लोखंडे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सध्या देवेंद्र हे ‘छुमंतर’ या विनोदी …

Read More »

“पप्पा खूप काही खरेदी करू शकतात पण…”, कंगना रणौतने आलिया भट्टवर अप्रत्यक्ष टीका

पण नुकतंच कंगना रणौतने आलिया भट्टवर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पण नुकतंच कंगना रणौतने आलिया भट्टवर टीका केली आहे. कंगना रणौतने बहिण रंगोलीची एक पोस्ट शेअर करत आलियावर …

Read More »

“माझे अनेक बॉयफ्रेंड होते पण नागार्जुन…”, अभिनेत्री तब्बूचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखले जाते. तब्बूच्या अनेक चित्रपट आजही हिट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. वयाची ५० ओलांडूनही तब्बू अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न का केले नाही? याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. सिनेसृष्टीत एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन याच्यासोबत …

Read More »

“पावनखिंड चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्या…”रितेश देशमुखनं केलं चित्रपटाचं कौतुक

रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण …

Read More »

“खरच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तर सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने …

Read More »