फेब्रुवारी 27, 2024
Breaking News
  • पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
  • मुहूर्त न बघाताही ‘या’ मंदिरात करता येतो विवाह, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर
  • 21 एलीट शेफ, 2500 डिश, रात्री 4 वाजताही जेवणाची व्यवस्था! अंबानींचा प्री वेडिंग मेन्यू पाहा
  • बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले
  • ‘राणेंना ताटावरुन अटक केली, 80 लाख खर्च करुन कंगणा..’; शिंदेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज कुंद्रानंतर आता शिल्पा व शमिता शेट्टीही अडचणीत; आईसह दोघींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश


शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार असं दिसतंय. मुंबईतील अंधेरी कोर्टाने शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. यासोबतच न्यायालयाने तिघांनाही २८ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण २१ लाखांच्या कर्जाशी संबंधित आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील अंधेरी कोर्टाने एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले आहे. तिघींनीही २१ लाखांचे कर्ज फेडले नसल्याचा आरोप व्यावसायिकाने केला होता. व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने तिघींना २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने या तिघींविरुद्ध M/s Y&A Legal या लॉ फर्ममार्फत २१ लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी २०१७ मध्ये व्याजासह द्यायचे होते, असा दावा व्यावसायिकाने केला आहे.

तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना त्यांच्या वडिलांनी २०१५ मध्ये घेतलेले कर्ज फेडण्यात अपयश आले. त्यांच्या वडिलांनी वार्षिक १८ टक्के व्याजाने कर्ज घेतले. त्यांनी आपल्या मुली आणि पत्नीला कर्जाबाबत सांगितले होते, असा फिर्यादीचा दावा आहे. मात्र, कर्ज फेडण्याआधीच ११ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला.

The post राज कुंद्रानंतर आता शिल्पा व शमिता शेट्टीही अडचणीत; आईसह दोघींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …