Tag Archives: manoranjan News in Marathi

शबाना आझमींनी कंगनाला ‘त्या’ पोस्टमुळे फटकारले म्हणाल्या, ‘अफगाणिस्तान हा…’

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. या वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलने केली जात आहेत. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. तिची पोस्ट पाहून आता अभिनेत्री शबाना आझमी …

Read More »

“ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

मृणाल ठाकूर सगळ्यात शेवटी ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिला अभिनेत्री नाही तर क्राईम जर्नलिस्म करायंच होतं आणि टिव्हीवर दिसायंच होतं, असा खुलासा केला आहे. पण तिच्या आई-वडिलांची ही इच्छा होती की तिने डेन्टिस्ट व्हावे. मृणालने नुकतीच …

Read More »

मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलला लोकांनी ओळखलं अन्…

बॉलिवूड कलाकार हे बराच वेळा सर्वसामान्यांप्रमाणे रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना तसे जगणे शक्य होत नाही. आता सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा मुंबईतील रस्त्यावर बाईक चालवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. मुंबईत रात्री बाईकवर दिसलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षीने हेलमेट घातले होते, तोंडाला मास्क …

Read More »

कर्नाटकमधील हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”

कंगना रणौतने इराणमधील पाच दशकांपूर्वीचा फोटो शेअर करत दिला सल्ला कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली …

Read More »

शस्त्रक्रियेनंतर कशी आहे सुनील ग्रोवरची तब्येत? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

शस्त्रक्रिया झाल्यानंतर अभिनेता सुनील ग्रोवरची पहिली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. टीव्ही जगतातील सर्वांचा आवडता विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवरवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली. मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये त्याच्यावर ४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३ फेब्रुवारीला त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनील ग्रोवरनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून तब्येत कशी आहे याची माहिती दिली आहे. त्याची ही …

Read More »

“मला वेळ द्या…”, अर्जुन कपूर आणि मलायकाच्या लग्नावर अरबाज खानने सोडले मौन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला, त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं …

Read More »

‘गहराइयां’च्या बोल्ड दृश्यांसाठी रणवीरची परवानगी घेतली होती का? दीपिकानं दिलं उत्तर

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दीपिकाची बोल्ड दृश्यं ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने निवडलेले बोल्ड आउटफिट्स या सगळ्याचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाला तिनं लग्नानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिलेल्या बोल्ड सीनवरून प्रश्न विचारण्यात आले. दीपिका पदुकोण ‘गहराइयां’ चित्रपटात बोल्ड अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तिने सिद्धांतसोबत किसिंग …

Read More »

‘रणवीरमुळेच मी बोल्ड झाले…’, दीपिकानं सांगितलं ‘गहराइयां’ निवडण्यामागचं कारण

‘गहराइयां’ चित्रपटात दीपिका पदुकोणनं बरीच बोल्ड दृश्य दिली आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ चित्रपट येत्या ११ फेब्रवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विशेषतः या प्रमोशनसाठी दीपिकानं घातलेल्या बोल्ड आउटफिट्सची सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होताना दिसत आहे. ‘गहराइयां’ चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. ज्यावरून दीपिकाला मुलाखतींमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले …

Read More »

Video: अल्लू अर्जुनच्या ५ वर्षांच्या मुलीने केला ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स

सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या मुलीने देखील या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा क्यूट डान्स …

Read More »

आदित्य पंचोलीवर निर्मात्यानं केला मारहाणीचा आरोप, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

अभिनेता आदित्य पंचोलीवर एका निर्मात्यानं मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. एक प्रसिद्ध निर्मात्यानं आदित्य पंचोलीवर शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या निर्मात्यानं आदित्य पंचोलीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे. वादग्रस्त …

Read More »