पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनाच्या काही तासांपूर्वी दिप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. पण आता त्याच्या अशा अचानक झालेल्या निधनानं त्याची गर्लफ्रेंड रीनालाही मोठा धक्का बसला आहे. दीप सिद्धूचा अपघात होण्याच्या काही तास अगोदरच रीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट लिहिली होती.
दीप सिद्धू आणि त्याची गर्लफ्रेंड रीना राय यांनी १४ फेब्रुवारीला रोमँटिक अंदाजात व्हॅलेंटाइन डेचं सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी रीनाला काही वेळातच तिचा बॉयफ्रेंड तिला कायमचा सोडून जाईल याची कल्पनाही नव्हती. १४ फेब्रुवारीला इतर प्रेमी युगुलांप्रमाणेच दीप आणि रीनानंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला होता आणि याचे काही फोटो रीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यासोबतच तिनं दीप सिद्धूला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

रीना राय आणि दीप सिद्धूच्या या फोटोंमध्ये ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसत आहे. रीनानं यावेळी फ्लोरल प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर दीप जीन्स आणि जॅकेटमध्ये खूपच हॅन्डसम दिसत होता. दोघंही मिररमध्ये पाहून सेल्फीसाठी पोज देत असलेले या फोटोमध्ये दिसत आहेत. निधनाआधी दीपनं गर्लफ्रेंडसोबत चांगला वेळ व्यतित केला होता हे या फोटोमध्ये दिसून येत आहे.
आणखी वाचा- ‘जेव्हा कोणी माझ्याशी फ्लर्ट करतं तेव्हा…’ माधुरी दीक्षितनं केला अजब खुलासा
दीप सिद्धू व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी गर्लफ्रेंड रीना रायसोबत त्याच्या कारमधून दिल्ली ते पंजाब असा प्रवास करत होता. त्यावेळी अचानक केएमपीवर पिपली टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची स्कॉर्पिओ कार एका ट्रकला जाऊन धडकली आणि हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याची गर्लफ्रेंड रीनाची प्रकृती आता स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे.