Tag Archives: India

भारतात ८३ हजार जागांसाठी १६ लाख अर्ज, विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविण्याचे दडपण

Indian Students In Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine war) युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हवाईमार्गे देशात आणण्यात आले. दरम्यान युक्रेनमधील खार्किव येथे एमबीबीएसचे शिक्षण (MBBS Study) घेण्यासाठी गेलेल्या नवीन शेखरप्पा याचे रशियाच्या हल्ल्यामध्ये दुर्देवी निधन झाले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यातून …

Read More »

विश्लेषण : देशाच्या रक्षणासाठी युक्रेनचे खेळाडू रणभूमीवर!

युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे प्रशांत केणी रशियाने केलेल्या आक्रमणानंतर एकीकडे देशवासी खेळाडूंकडून टीका होत असताना युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी बॉक्सर व्हिटाली आणि व्लादिमिर क्लिट्स्को बंधू, व्हॅसिली लोमाशेन्को, लेकसँड्र युसिक, सर्जी स्टॅखोवस्की या युक्रेनच्या खेळाडूंसह ड्नीप्रो फुटबॉल क्लब रणभूमीवर उतरला आहे. यात देशातील प्रतिष्ठित …

Read More »

मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने …

Read More »

Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा दर

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

Russia Ukraine War : प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली मुलं वाचवा ; सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला आवाहन

“आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत” असं देखील सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं मागील पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियाला प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येत भारतीय विद्यार्थी व नागरीक असल्याने, त्या सर्वांना तिथून सुरक्षितपणे भारतात परत …

Read More »

विश्लेषण : क्रीडा क्षेत्राकडून रशियावर बहिष्कारास्त्र!कोणकोणत्या खेळांतून रशिया हद्दपार?

इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहे. सिद्धार्थ खांडेकर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहेत. हे करत असताना युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबाही दिला जातोय. फिफा, युएफा, ऑलिम्पिक समितीकडून काय कारवाई? – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि युरोपिय फुटबॉल महासंघ (युएफा) यांनी रशियाच्या सर्व संघांवर …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत अडकलेल्या पत्नी व मुलासाठी लंडनच्या शिक्षकाने नोकरी सोडली अन् गाठलं युक्रेन!

प्रवासादरम्यान सोशल मीडियाद्वारे आपल्या वन मॅन मिशनचे वेळोवेळी दिले आहे अपडेट “माझी पत्नी आणि मुलगा युक्रेनमध्ये असताना मी इथे बसून राहू शकत नाही. युक्रेनचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुतीन यांच्यामुळे धोक्यात आली आहे.” अशी फेसबुकवर पोस्ट करत लंडनमधील इयान उमने नावाचा इंग्रजी विषयाचा एक शिक्षक नोकरीचा राजीनामा देऊन, स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला आहे. त्याने हे वन मॅन मिशन …

Read More »

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान का होतेय व्लादिमीर पुतिन यांच्या टेबलची चर्चा?

गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीदरम्यान लोकांचे लक्ष ते ज्या टेबलावर बसले होते त्याकडे वेधले गेले. रशिया आणि युक्रेनदरम्यान अद्याप युद्ध सुरूच आहे. रशियाचे सैन्य सातत्याने पुढे येत असून ते युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचले आहे. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी अनेक देश मध्यस्थीसाठी पुढाकारही घेत आहेत. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल …

Read More »

“आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास….”; पुतिन यांचा जगभरातील देशांना पुन्हा इशारा

रशियाकडून युक्रेनवर हल्ला सातत्याने सुरू आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिका या रशियाला या युद्धाच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला की, “रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास …

Read More »

Russia Ukraine war: …जेव्हा कुत्र्याचे पिल्लू युक्रेनच्या सैनिकांसाठी देते पहारा

या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. सर्व तणावाच्या परस्थितीत, युद्धाच्यामध्ये असा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो चांगलचं चर्चेत आला आहे. युक्रेनियन सैनिकांच्या दयाळूपणाने सर्वांचे मन जिंकले. मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युक्रेनियन सैनिक थंडीत बाहेर एकट उभ्या असलेल्या एका पिल्लाला आतमध्ये घेतना, त्यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. हे …

Read More »

जगातील 10 सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते? रशियाचे ही नाव असणाऱ्या ‘या’ यादीत भारत कितव्या स्थानावर?

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. परंतु युक्रेन देखील काही कमी नाही. युक्रेनच्या सैन्यांनी रशियाचे अनेक टँक नष्ट केलेत. त्यात गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक असं विधान केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. यामध्ये त्यांनी गरज पडल्यास इतिहासात जे …

Read More »

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनी सेनादेखील रशियन सेनेला तोडीस तोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. हा बॉम्ब युक्रेनच्या लोकांचे संरक्षण करेल. …

Read More »

Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

“ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपाचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजपा नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले.” रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेचे ऑफर धुडकावून झेलेन्स्की यांनी आपण देशामध्येच राहणार असून रशियाविरोधात लढणार असल्याचं म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सध्या जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थनाची मागणी …

Read More »

Russia Ukraine War: “…म्हणून मी युक्रेन सोडून मायदेशी परतणार नाही,” भारतीय मुलीचा निर्धार

नेहाने गेल्या वर्षी युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियन सैन्य राजधानी किव्हकडे आगेकुच करत असून क्षेपणास्त्र हल्ला सुरुच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे युद्ध सुरूच राहणार आहे. युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांना रशियाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. …

Read More »

Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या …

Read More »

Russia-Ukraine War : बाबा वेंगांची रशियाविषयीची भविष्यवाणी चर्चेत; त्या म्हणाल्या होत्या, “रशियाच जगावर…!”

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभरात चिंतायुक्त चर्चा झडताना पाहायला मिळत आहेत. रशिया युक्रेनवरील हल्ले थांबवायला तयार नसताना युक्रेननं देखील लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी कधीकाळी केलेल्या एका भविष्यवाणीची जोरदार …

Read More »

Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय. युक्रेन युद्धामध्ये रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. आम्ही नागरी वस्त्यांवर …

Read More »

याला म्हणतात देशप्रेम! रशियन फौजांना रोखण्यासाठी तो पुलावर उभा राहिला अन्…

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. युक्रेनविरुद्ध रशियाची लष्करी मोहीम अद्यापही सुरू आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आणि सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचा आवाज आला. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्यात एक मोठी …

Read More »

आकाशातून होणारे हवाई हल्ले अन् बॉम्बस्फोटाचा आवाज; भयावह परिस्थितीत विवाहबद्ध झालं युक्रेनमधील जोडपं

जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. …

Read More »

रशियाकडून राजधानी किव्हवर हल्ले वाढत असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ आला समोर, म्हणाले…

युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाचे हल्ले वाढत आहे. रशियन सैन्य किव्हच्या दिशेने जात आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण किव्हमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील किव्हमध्येच आहेत, असं स्पष्ट केलं होतं. आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचं ते म्हणाले होते. अशातच झेलेन्स्की यांनी शुक्रवारी किव्हमधून एक …

Read More »