आकाशातून होणारे हवाई हल्ले अन् बॉम्बस्फोटाचा आवाज; भयावह परिस्थितीत विवाहबद्ध झालं युक्रेनमधील जोडपं


जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशातच राजधानी किव्हमध्ये एक जोडपं विवाहबद्ध झालंय.

“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती

यारीना अरिएवा आणि तिचा जोडीदार श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी मे महिन्यात युक्रेनची राजधानी किव्ह येथील रेस्टॉरंटच्या टेरेसवर लग्न करण्याची तयारी केली होती. परंतु लग्नाचं सगळं प्लॅनिंग तसंच ठेवत आणि शाही विवाहाचं स्वप्न बाजूला सारत त्यांनी या आठवड्यात एका मठात घाईघाईत लग्न केलंय. नीपर नदीच्या काठी असलेल्या रेस्टॉरंटच्या टेरेसवर लग्नाची स्वन रंगवलेल्या या जोडप्यानं जेव्हा लग्न केलं तेव्हा रशियाकडून हवाई हल्ला सुरू होता. आणि त्या भीतीदायक आवाज आणि वातावरणात फक्त सोबत राहण्यासाठी जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं.

हेही वाचा :  केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेसाठी टाटा, महिंद्रा, ह्युंदाईची निवड, यादीत मारुती कंपनी नाही कारण…

रशियाकडून राजधानी किव्हवर हल्ले वाढत असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ आला समोर, म्हणाले…

यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच लग्न करून घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांचे भविष्य कसे असेल, याची खात्री नव्हती. गेल्या काही आठवड्यांपासून देशात तणाव निर्माण झाला होता आणि शेवटी त्यांना ज्याची भीती वाटत होती तेच घडले. रशियन सैन्याने आक्रमण केलं आणि राजधानी किव्हसर अनेक मोठ्या शहरांवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला.

Russia Ukraine War News Live: “आम्हाला दारूगोळा हवा आहे”; अमेरिकेची मदत नाकारत झेलेन्स्की यांचा किव्ह सोडण्यास नकार

किव्ह सिटी कौन्सिलच्या डेप्युटी असलेल्या २१ वर्षीय यारीनाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या २४ वर्षीय फुरसिनशी किव्हच्या सेंट मायकेल मठात लग्न केले. लग्नात हे दोघेही खूप उदास दिसत होते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, यारीना म्हणाली की, “ते सर्व खूप भीतीदायक होतं. तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवशी तुम्ही हवाई हल्ल्याच्या सायरनचा आवाज ऐकताय, यापेक्षा वाईट काय असू शकतं. लग्न करताना आमचा मृत्यूही होऊ शकला असता, परंतु त्यापूर्वी आम्हा दोघांना सोबत रहायचं होतं, म्हणून आम्ही लग्न केलं. आम्ही आमच्या भूमीसाठी लढत राहू,” असा निर्धारही यावेळी तिने केला.

हेही वाचा :  ‘गहराइयां’च्या बोल्ड दृश्यांसाठी रणवीरची परवानगी घेतली होती का? दीपिकानं दिलं उत्तर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …