“ … याचा अर्थ १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दाऊदसह सगळ्याच गुन्हेगारांना महाविकास आघाडीचे नेते पाठबळ देतायत”


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास टीका ; अटक होऊन नवाब मलिकांचा राजीनामा का नाही ? असा सवालही केला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बेनामी संपत्ती प्रकरणी अटक केलेली असतानाही ते राजीनामा देत नाहीत, शिवाय महाविकास आघाडीचे नेते देखील मलिक राजीनामा देणार नसल्याचं बोलत आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक यांना बेनामाई जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर देखील ते राजीनामा देत नाहीत. महाविकास आघाडीचे नेते देखील नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत, असं सांगतात. याचा अर्थ १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या नेतृत्वातील सगळ्या गुन्हेगारांना हे पाठबळ देत आहेत. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते, त्यांना मदत करणारे नवाब मलिक कसे बरोबर होते असं सांगण्याचा, असं दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. भाजपा हा प्रयत्न सहन करणार नाही.”

हेही वाचा :  Pune News : दादा पुणेकरांना वाचवा..काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

तसेच, “सुरूवातीला समजणे वालो को इशारा काफी…. या प्रमाणे आम्ही तीन दिवस निदर्शने केली पण आता आणखी एखादा दिवस वाट पाहून या सगळ्या विषयातली खूप तीव्र प्रतिक्रिया भाजपा सुरू करेल. एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर, २४ तासांच्या आत त्याला निलंबित करायचं असतं आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला नोकरीतून काढायचं असतं. तर मग ते एका मंत्र्यासाठी ते लागू नको का?” असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …