शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद

शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद

शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद


पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद आणि चाकण येथील दोन अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर वाहिन्यांमध्ये बुधवारी (९ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने वीजसंकट निर्माण झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, लोणीकंद वाघोली आदी भागातील तब्बल २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यातील काही भागामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी १२ या वेळेत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. काही भागांमध्ये दुपारी तीननंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. एकाच वेळी मोठय़ा विभागाचा वीजपुरवठा खंडित होण्याची ही गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना ठरली. वीजबंदमुळे शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. पाणीपुरवठय़ावरही वीजबंदचा परिणाम झाला.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  महापारेषणच्या लोणीकंद ते चाकण आणि चाकण ते तळेगाव या दोन्ही टॉवर वाहिनीच्या एकूण ५ सर्किटमध्ये दाट धुके आणि दव यांचा परिणाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. परिणामी  लोणीकंद आणि चाकण या ४०० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या उपकेंद्रांतून महावितरणच्या तब्बल १८९ उपकेंद्रांना होणार वीजपुरवठा देखील ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील सुमारे १५ लाख १३ हजार, पिंपरी चिंचवड शहरातील ७ लाख २५ हजार तसेच लोणीकंद, वाघोली, चाकण या ग्रामीण परिसरातील सुमारे १ लाख ८० हजार अशा एकूण २४ लाख १८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.

हेही वाचा :  विश्लेषण : रामानुजाचार्य पुतळा अनावरण आणि मोदींची दक्षिणनीती…; काय आहे हे समीकरण?

सुरुवातीला पर्यायी व्यवस्थेतून वीज मिळवून काही भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. पुणे शहर अंतर्गत रास्ता पेठ, बंडगार्डन, पर्वती, कोथरूड, नगर रोड, शिवाजीनगर विभागामध्ये पर्यायी व्यवस्थेतून सकाळी साडेअकरापर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पद्मावती विभागामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत पिंपरी विभागामध्ये दुपारी बारापर्यंत संपूर्ण भागात वीजपुरवठा सुरू करण्यात आला. भोसरी विभागामध्ये सकाळी सव्वादहापर्यंत एमआयडीसी आणि घरगुती ग्राहकांसह सुमारे ५५ टक्के भागात वीजपुरवठा सुरू करण्यात आला. उर्वरित ४५ टक्के भागात दुपारी साडेतीनपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. यासोबतच ग्रामीण भागामध्ये लोणीकंद, वाघोली परिसरातील वीजपुरवठा सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. चाकण एमआयडीसीमधील वीजपुरवठा देखील दुपारी सव्वाबारा वाजता सुरू करण्यात आला.

विजेचा प्रवास कसा?

महानिर्मिती कंपनीकडून विजेची निर्मिती केली जाते. तेथून वीज वाहून वीजकेंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीची असते आणि केंद्रातून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्याचे काम महावितरणकडून केले जाते. महानिर्मिती किंवा इतर वीजनिर्मिती कंपन्यांकडून निर्माण केलेली वीज ही महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाबाच्या टॉवर लाइनद्वारे त्याच कंपनीच्या ४०० केव्ही, २२० केव्ही व १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांपर्यंत आणली जाते. या अति उच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरण कंपनीच्या ३३ केव्ही, २२ केव्ही व ११ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या वीजवाहिन्या आणि रोहित्रांद्वारे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शेती आदी सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

हेही वाचा :  कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठाही विस्कळीत

पिंपरी : वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. बुधवारी सकाळी काही तास पिंपरी-चिंचवडकरांची मोठी गैरसोय झाली. महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्हीही उच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा सकाळी सहा वाजल्यापासून खंडित झाला. रावेत येथील जलउपसा केंद्र व पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धिकरण केंद्राचा वीजपुरवठाही खंडित झाला. त्याचा परिणाम शहरभराच्या पाणीपुरवठय़ावर झाला. सकाळपासून पालिकेची यंत्रणा कामाला लागली. साडेअकराच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर, विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम दिवसभर सुरू होते.

कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राचा आधार

वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपात्कालीन नियोजन केले. यामध्ये कोयनेतील वीजनिर्मिती वाढविण्यात आली. त्यातून महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला. जेजुरी उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सकाळी साडेआठपासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणकडून तांत्रिक उपाययोजना करण्यास वेगाने सुरुवात झाली. यामध्ये दुपारी बारापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण परिसराच्या ८० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. महापारेषणच्या युद्धपातळीवरील दुरुस्ती कामामुळे टॉवर वाहिनीच्या पाचपैकी दोन सर्किटच्या दुरुस्तीचे काम दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे या दोन्ही सर्किटवरून महावितरणच्या काही उपकेंद्रांना वीजपुरवठा सुरू झाला.

हेही वाचा :  अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क

The post शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …