Russia Ukraine War : प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली मुलं वाचवा ; सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला आवाहन


“आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत” असं देखील सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं

मागील पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियाला प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येत भारतीय विद्यार्थी व नागरीक असल्याने, त्या सर्वांना तिथून सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात यश देखील आले असून, हे कार्य सुरूच आहे. मात्र तरी देखील शेकडोच्या संख्येने अद्यापही विद्यार्थी युक्रेनमध्ये जीव मूठीत धरून अडकलेले आहेत. आज एका भारतीय विद्यार्थ्याचा या युद्धाने बळी घेतल्याची घटना देखील घडली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला एक आवाहन केलं आहे.

“माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  VIDEO: पुण्यात कोयत्या गँगचा करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत पसरवली तिथेच काढली धिंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद यात्रेला खासदार सुप्रिया सुळे पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, “सातत्याने आम्ही सगळे केंद्र सरकारकडे विनंती करीत आहोत. युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. शरद पवार यांनी काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन देखील केला होता. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. केंद्र सरकारे जातीने लक्ष घातलं पाहिजे. आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत. ही घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, कृपया कृती करा. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …