Ajay Purkar : अजय पुरकर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत

Ajay Purkar On Subhedar : दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्कातील पाचव्या सिनेमाची म्हणजेच ‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे. 

‘सुभेदार’ या सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. नुकताच या सिनेमाच्या संहिता पूजनाचा कार्यक्रम तानाजी मालुसरे यांच्या मुळगावी गोडवलीत पार पडला. तर अभिनेत्री स्मिता शेवाळे तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 


News Reels

‘सुभेदार’ सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून पुढील वर्षी जून महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमा तानाजी यांनी राखलेल्या सिंहगडाची थराथक कथा पाहायला मिळणार आहे.पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम ‘सुभेदार’मध्ये अनुभवायला मिळेल. 

अजय पुरकर यांचे ‘कोडमंत्र’ नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा अजय पुरकर भाग आहेत.

हेही वाचा :  मूड बना लिया... Amruta Fadnavis थिकरल्या; चाहत्यांना आवाहन करत म्हणाल्या...

संबंधित बातम्या

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांनी चित्रपटाचा विषय बदलला? ‘सुभेदार’ च्या घोषणेनंतर चाहत्यांचा प्रश्न



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …