Happy Birthday Kamal Haasan : जाणून घ्या सुपरस्टार कमल हासनच्या खास गोष्टी…

Kamal Haasan Birthday : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा (Kamal Haasan) आज वाढदिवस आहे. कमल यांनी 1959 साली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या अनेक सिनेमांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. 

‘अपूर्व रागंगल’ने दिला ब्रेक!

‘अपूर्व रागंगल’ या सिनेमाने कमल हासनला खरा ब्रेक दिला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह कमल हासन यांनी बॉलिवूडमध्येदेखील स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर ते ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक सिनेमांत झळकले. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. कमल हासन एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले आहे.

विवाहसंस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही : कमल हासन

सिनेमांसह कमल हासन त्यांच्या अफेअरमुळे कायमच चर्चेत होते. पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासन म्हणाले होते,”विवाहसंस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही”. कमल हासनच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. त्यापैकी दोघींसोबत तो लग्नबंधनात अडकला. एकीसोबत 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतरही त्यांचं नातं संपुष्टात आलं. 

हेही वाचा :  'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅनला काय काय मिळालं?

कमल हासन अफेअरमुळे कायम चर्चेत… 

अभिनेत्री श्री विद्यासोबत कमल यांचं 70 च्या दशकात अफेअर होतं. अनेक सिनेमांत दोघे स्क्रीन शेअर करताना दिसले आहेत. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर 1978 साली कमल यांनी वाणी गणपतीसोबत पहिलं लग्न केलं. पण हे लग्न दहा वर्षच टिकलं. त्यानंतर 1988 साली दोघांचा घटस्फोट झाला. 

वाणीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासनच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एन्ट्री झाली. त्यांनी 1988 साली लग्न केलं. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण 2004 साली कमल  आणि सारिकाचा घटस्फोट झाला. त्यानंतर कमलच्या आयुष्यात सिमरन आली. सिमरन कमल यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असल्याने त्यांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली. 

तमिळनाडूमध्ये कमल हासन यांचा पराभव

अभिनेता-राजकारणी कमल हासन यांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी हासन यांना पराभूत केले होते. कोयंबतूर दक्षिण जागेवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. शेवटी भाजपने येथे आपला विजय नोंदविला. दरम्यान, तमिळनाडूमध्ये संत्तातर झाले असून आता डीएके युती सत्तेत आली आहे.

हेही वाचा :  Shah Rukh Khan : किंग खानचे चाहते नाराज, शाहरुख नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करणार नाही

संबंधित बातम्या

Vikram Box Office : कमल हासनच्या ‘विक्रम’चा बॉक्स ऑफिवर महाविक्रम! 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …