माझ्या मुलीसह सर्व भारतीय विद्यार्थांना युक्रेनमधून सुखरूप भारतात आणा – पालकांची कळकळीची विनंती!


मुलांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढा, असंही म्हणाले आहेत.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला असून, हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, त्यांना सुखरूप भारतात आणावे अशी कळकळीची विनंती युक्रेनमध्ये अडकलेल्या साक्षी बोरोटे हिच्या पालकांनी प्रशासनाला केली आहे.

साक्षी बोराटे ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षांत असून युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. तिच्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी साक्षीच नव्हे तर इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रशासनाने भारतात सुखरूप आणावे असे म्हटलं आहे. त्याचबरोबर मुलांकडे असलेले एटीएम कार्ड हे चालत नसल्याने खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांना अडचणी येत असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

साक्षीचे वडील सतीश बोराटे म्हणाले की, युक्रेन येथे एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी मागीलवर्षी पासून माझी मुलगी साक्षी तिथे गेलेली आहे. रशिया आणि युक्रेनचा जो वाद चालला आहे. त्याचा मुलांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. माझी शासनाला एकच विनंती आहे की विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणावे. तेथील परिस्थिती भयानक आहे. मुलांना हॉस्टेलच्या बाहेर येता येत नाही. त्यांच्याकडील एटीएम कार्ड कुठेच चालत नाही. त्यामुळं ते खाद्यपदार्थ खरेदी करू शकत नाहीत.

हेही वाचा :  “पं. दिनानाथ मंगेशकर बाजूला झाले आणि म्हणाले हिचे गाणे ऐका..”; लतादीदींच्या पहिल्या कार्यक्रमाच्या सोलापूरकरांनी जागवल्या आठवणी

Russia Ukraine War Live: “युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं व्लादिमीर पुतिन यांना चर्चेसाठी आमंत्रण; रशियन सैन्य राजधानीत घुसल्याने निर्णय़

तसेच, प्रशासनाने रस्ते मार्गाने त्यांना सुखरूप ठिकाणी घेऊन यावं ही कळकळीची विनंती. त्यांनी प्रशासनाला केली आहे. तर, साक्षीची आई सपना बोरोटे म्हणाल्या की, साक्षीशी बोलणं झालं, पण तेथील वातावरण पाहता त्यांना भीती वाटत आहे. तिच्यासह इतर विद्यार्थी आहेत. त्यांना खाद्यपदार्थची सुविधा करावी. असेही त्या म्हणाल्या आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …