“तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो…”, ‘ती परत आलीये’ मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत


सध्या ते ‘छुमंतर’ या विनोदी नाटकात काम करत आहे.

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘ती परत आलीये.’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून देवेंद्र सरदार यांना ओळखले जाते. देवेंद्र सरदार यांनी या मालिकेत लोखंडे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सध्या देवेंद्र हे ‘छुमंतर’ या विनोदी नाटकात काम करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजा अत्रे दिग्दर्शित ‘छुमंतर’ हे विनोदी नाटक सध्या चांगलेच चर्चेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाचे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण या नाटकाच्या टीमने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. छुमंतर या मराठी नाटकात काम करणाऱ्या देवेंद्र सरदार यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

देवेंद्र सरदार यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “काल चौकच्या छुमंतर नाटकाच्या नाट्यप्रयोगातून स्वराली आणि स्वरांजली या दोन बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी केलेल्या पहिल्या प्रयोगातून ८१,७०० रोख रक्कम त्यांच्या पालकांकडे प्रेक्षकांसमोर सुपूर्द केली. अजून ९ प्रयोग छूमंतर टीम यांच्या मदतीसाठी करणार आहे. त्याचा पुढचा प्रयोग कर्जत येथे ६ मार्चला रॉयल गार्डनला आहे. नक्की या… तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो”, असे त्यांनी यात म्हटले आहे. देवेंद्र यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा :  Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"

“पैसा, नवं सावज, लग्न अन्…”, ‘देवमाणूस २’ मालिकेत नवा थरार, व्हिडीओ पाहिलात का?

‘छूमंतर’ हे एक विनोदी नाटक आहे. या नाटकाचे आतापर्यंत अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहे. सध्या हे नाटक हाऊसफुल ठरत आहे. या नाटकाच्या टीमने घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देवेंद्र सरदार यांनी ती परत आलीय या मालिकेत लोखंडे ही भूमिका साकारली होती. तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही ते झळकले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

Confirm Train Ticket: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आधी कन्फर्म तिकिट असणं महत्त्वाचे असते. …

भारतातही अमेरिकेप्रमाणे ‘वारसा कर’ लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद

Inheritance Tax In India: इंडियन ओव्हरसीज काँग्रेस म्हणजेच अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या …