भारतात ८३ हजार जागांसाठी १६ लाख अर्ज, विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविण्याचे दडपण

Indian Students In Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine war) युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हवाईमार्गे देशात आणण्यात आले. दरम्यान युक्रेनमधील खार्किव येथे एमबीबीएसचे शिक्षण (MBBS Study) घेण्यासाठी गेलेल्या नवीन शेखरप्पा याचे रशियाच्या हल्ल्यामध्ये दुर्देवी निधन झाले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यातून भारतातील शिक्षणाची वास्तववादी स्थिती समोर आली आहे.

२१ वर्षीय नवीनचे वडील शेखरप्पा ज्ञानगौदार यांनी सांगितले की, माझ्या मुलाला पीयूसीमध्ये ९७ टक्के गुण मिळाले होते, तरीही त्याला राज्यात मेडिकलमध्ये जागा मिळू शकली नाही. भारतातील गुणवंत मुलांना देशात वैद्यकीय जागा मिळवण्यासाठी करोडो रुपये मोजावे लागत असल्याने त्यांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते असेही ते म्हणाले. नवीनच्या वडिलांच्या विधानातून वेदनांसोबत त्यांचे दडपणही दिसत होते. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील शुल्क वाढीमुळे अशा अनेक पालकांना आपल्या पाल्यांना परदेशात पाठवावे लागते.

भारतात प्रवेश मिळणे खूप अवघड
प्रत्यक्षात भारतात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे खूप अवघड असल्याचे अनेक पालकांचे मत आहे. देशात उपलब्ध असलेल्या एमबीबीएसच्या जागांच्या संख्येवरून याचा अंदाज बांधता येतो. सध्या भारतात एमबीबीएसच्या साधारण ८३ हजार जागा आहेत. आणि यासाठी २०२१ च्या नीट परीक्षेत १६ लाख मुलांनी नोंदणी केली होती. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी १९ मुले एकमेकांशी स्पर्धा करत होती.

हेही वाचा :  भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम - ऑक्टोबर 2023

MPSC अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
तर दुसरीकडे युक्रेन आणि रशियासारख्या देशांमध्ये प्रवेश मिळवणे खूप सोपे आहे. उदाहरणार्थ, नीट उत्तीर्ण असेल तर परदेशात लगेच प्रवेश मिळतो. पण भारतात जागा कमी आणि कट ऑफ मार्क्स खूप जास्त आहेत. त्यामुळे नीट पास केल्यानंतरही प्रवेश मिळेलच याची खात्री नसते.

IBM Recruitment 2022: इंडियन ब्युरो माइन्समध्ये विविध पदांची भरती
शुल्कातील फरक
भारतात एकूण ५४९ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. भारतातील एकूण ८३ हजार जागांपैकी साधारण ३८,८०० जागा खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. जिथे किमान ६० ते ७० लाख रुपये खर्च फक्त फीवर होतो. तर सरकारी महाविद्यालयांमध्ये साधारण ४२,७०० जागा आहेत. जिथे अभ्यासाचा खर्च ८ ते १० लाख रुपये येतो. पण तिथेही दुहेरी स्पर्धा असते. दुसरीकडे युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी २० ते २५ लाख रुपये इतका खर्च होतो.

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
भारतात डॉक्टरांची संख्या कमी

विकसित देशांशी तुलना केल्यास, भारतात दर १०० लोकसंख्येमागे डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. २०१९ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतात दर १००० लोकसंख्येमागे ०.९२८ डॉक्टर आहेत. फ्रान्समध्ये ६.५, यूकेमध्ये ५.८, यूएसएमध्ये २.६ डॉक्टर आहेत. जेणेकरून १३० कोटी लोकसंख्या असलेल्या नागरीकांच्या आरोग्याच्या गरजा भागाव्यात यासाठी भारताला अधिकाधिक डॉक्टरांची गरज आहे.

हेही वाचा :  JEE Main 2022 Exam: एनटीएकडून जेईई मेन परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
SEBI मध्ये विविध पदांची भरती, थेट लिंकवरून पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …