Tag Archives: bollywood

Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार?

Samantha Ruth Prabhu Health : सौंदर्यवती समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता तिच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला ‘मायोसिटिस’ नावाज आजार झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून …

Read More »

मोहित रैनानं घटस्फोटाच्या चर्चेवर सोडलं मौन

Mohit Raina: गेल्या काही दिवसांपासून ‘देवों के देव महादेव’ (Devon Ke Dev Mahadev) फेम  अभिनेता मोहित रैनाच्या (Mohit Raina) घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मोहितनं त्याच्या लग्नसोहळ्याचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले असून तो लवकरच घटस्फोट घेणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता या चर्चांवर मोहितनं मौन सोडलं आहे.  काय म्हणाला मोहित रैना? एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये …

Read More »

Best Films Of 2022 : सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांच्या यादीत राजामौलींच्या ‘RRR’ने मारली बाजी!

RRR Beats Top Gun Maverick : ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे. एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘आरआरआर’ हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत …

Read More »

पठाण वादादरम्यान शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चत आहे. देशभरातील अनेक लोक शाहरुखला पठाण चित्रपटामुळे ट्रोल करत आहेत. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. त्यानंतर शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पठाण चित्रपटाच्या वादादरम्यान आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत …

Read More »

फिफा वर्ल्ड कप 2022 ला गेलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone Troll: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या चर्चेत आहे.  यंदा दीपिकाला  फिफा वर्ल्ड कप 2022  (fifa world cup final 2022) ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. …

Read More »

Virat-Anushka : विरुष्काचा नामांकित स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडसोबत वाद

Virat Kohli – Anushka Sharma Sportswear Brand Controversy : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता हे दोघे ‘पुमा’ या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडमुळे चर्चेत आहेत.  ‘पुमा’ (Puma) या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडने अनुष्काची परवानगी न घेता तिचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. ही गोष्ट अनुष्काच्या …

Read More »

Gauhar Khan Pregnancy : गौहर खानच्या घरी हलणार पाळणा

Gauhar Khan Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे.  ‘बिग बॉस 7’ची (Bigg Boss) विजेती गौहर खान 25 डिसेंबर 2020 रोजी झैद दरबारसोबत (Zaid Darbar) लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर लगेच तीन महिन्यात …

Read More »

‘एंपायर मॅगजीन’ने जाहीर केलेल्या उत्कृष्ट नटांच्या यादीत Shahrukh Khan ठरला एकमेव भारतीय!

Shah Rukh Khan Features In Empire Magazine : ‘पठाण’च्या वादात (Pathaan Controversy) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) आणखी एक खिताब आपल्या नावे केला आहे. ‘एंपायर मॅगजीन’ने (Empire Magazine) 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता शाहरुख खानचं नाव आहे.  50 महान अभिनेत्यांच्या यादीत ‘किंग खान’चा समावेश  ‘एंपायर मॅगजीन’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची …

Read More »

Govinda : अभिनय आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावणारा ‘गोविंदा’!

Govinda : नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज वाढदिवस आहे. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असं आहे. पण ‘गोविंदा’ या नावानेच तो ओळखला जातो. अनेक गाजलेल्या सिनेमांत गोविंदाने काम केलं आहे. नृत्याची अदा, विनोदाचं अंग आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे …

Read More »

Kuttey Trailer : अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’चा टीझर आऊट!

Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘कुत्ते’ (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.  ‘कुत्ते’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.  हटके नावामुळे या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता अर्जुनने या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर …

Read More »

दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ‘द कश्मीर फाईल्स कचरा आहे’

The Kashmir Files:  2022 मधील चर्चेत असलेला आणि कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सईद अख्तर मिर्जा (Saeed Akhtar Mirza) यांनी केलं. आता या चित्रपटावर एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले.  काय म्हणाले सईद अख्तर मिर्जा? ‘माझ्यासाठी …

Read More »

Hrithik Roshan : नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना

Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. आता ते दोघे विमानतळावर स्पॉट झाले आहेत. नवं वर्षाचं स्वागत हृतिक परदेशात करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हृतिक सुझान खानपासून विभक्त झाला होता. सुझानपासून विभक्त झाल्यापासून तो सबा आझादला डेट करत आहे. आता …

Read More »

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान!

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा (Sohail Khan) आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ लागतो.  सोहेलने 1997 साली ‘औजार’ (Auzaar) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमात संजय कपूर (Sanjay Kapoor), सलमान खान …

Read More »

पठाण चित्रपटाच्या वादावर रत्ना पाठक शाह यांची प्रतिक्रिया

Pathaan: अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) या वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मते मांडत असतात. लवकरच रत्ना पाठक शाह यांचा कच्छ एक्सप्रेस (Besharam Rang) हा गुजराती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून रत्ना या गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक शाह यांनी पठाण (Pathaan) या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया …

Read More »

Amit Antil : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Amit Antil : मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित अंतिल (Amit Antil) विरोधात लैंगिक शोषण (Sexual Harassment) आणि खंडणीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.  नेमकं प्रकरण काय? What exactly is Amit Antil case? दक्षिण मुंबईतील एका 42 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने महिलेसोबत अगोदर मैत्री केली. त्यानंतर दोघे …

Read More »

Pan India Movies : पुढील वर्षात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार पॅन इंडिया सिनेमे

South Films In 2023 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच आनंददायी होतं. केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2), कांतारा (Kantara) आणि आरआरआर (RRR) सारख्या अनेक पॅन इंडिया सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. एकंदरीतच या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाली. आता दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पुढील वर्षातदेखील कायम राहणार आहे.  आदिपुरुष (Adipurush) :  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ या सिनेमाचं …

Read More »

Santosh Juvekar : संतोष जुवेकर झळकणार ‘कुत्ते’ सिनेमात

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संतोषचा आगामी ‘कुत्ते’ (Kuttye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.  संतोषने लिहिलं आहे,”मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका ‘कुत्ते’. खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक सत्यात उतरलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम …

Read More »

‘लग्न कधी करणार?’; प्रभासनं दिलं मजोशीर उत्तर

Prabhas: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas) चाहता वर्ग मोठा आहे. प्रभास हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. बाहुबली आणि बाहुबली-2 या चित्रपटांमुळे प्रभासला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामुळे प्रभास पॅन इंडिया स्टार झाला. 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित आहे. प्रभास कधी लग्न करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो. नुकतीच प्रभासनं नंदमुरी बालकृष्ण यांच्या अनस्टॉपेबल 2 (Unstoppable 2) …

Read More »

Deepika Padukone FIFA : ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका जगातील पहिली अभिनेत्री!

Deepika Padukone FIFA : अर्जेंटिना-फ्रान्स (Argentina VS France) सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या वादादरम्यान …

Read More »

अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत; म्हणाली, ‘बेशरम रंग नाही तर लोकांचे…’

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं . हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहींनी या गाण्याचं कौतुक केलं तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनं (Suchitra Krishnamoorthi) एक ट्वीट शेअर करुन या गाण्याचं …

Read More »