‘मैं झुकेगा नहीं’..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!

Trending Video : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाचा उत्साह अजूनही लोकांच्या मनातून कमी झालेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, त्यातील गाणी आणि संवादांनी लोकांच्या हृदयावर आणि मनावर अशी जादू निर्माण केली आहे की, प्रत्येकजण चित्रपटाच्या गाण्यांवर आणि डायलॉग्सवर रील बनवत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. लग्न असो वा पार्टी, सगळीकडेच लोक श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसतात.

त्याच वेळी, आता सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका नवजात बाळाचा आहे. जो जन्मताच पुष्पा स्टाईलमध्ये त्याचा स्वॅग दाखवत आहे.

चिमुकल्याने जिंकलं नेटकऱ्यांचे मन!

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोके नक्कीच चक्रावून जाईल. कारण, हे नवजात बालक जन्माला येताच चक्क पुष्पा हुकस्टेप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा चिमुकला ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘मैं झुकेगा नही’ या प्रसिद्ध डायलॉगमधील हूकस्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अगदी कोणालाही आश्चर्य वाटेल.
व्हिडीओमध्ये, हे नवजात बाळ जन्माला येताच कॅमेऱ्याकडे पाहून काहीतरी करताना दिसत आहे, जे अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाईलशी अगदी मिळतीजुळती आहे. हा केवळ एक योगायोग आहे.

हेही वाचा :  पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'; टीझर रिलीज

पाहा व्हिडीओ :

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सगळेच या चिमुकल्याचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा पुष्पराज यांचा मुलगा कमलराज आहे.’ दुसर्‍या एका यूजरने लिहिले की, ‘असे वाटते की, बाळाच्या आईने पुष्पा चित्रपट बऱ्याचदा पाहिला असावा.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …