Tag Archives: bollywood

Salman Khan : बॉलिवूडचा ‘बजरंगी भाईजान’ सलमान खानविषयी जाणून घ्या…

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली ‘बीबी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल …

Read More »

Siddharth Jadhav : अन् ‘आपला सिद्धू’ भाव खाऊन गेला…

Siddharth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘सर्कस’ (Circus) या सिनेमात झळकत आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले.   रणवीर सिंह म्हणाला,”सिद्धू सोबतचा माझा हा …

Read More »

Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? किंग खान म्हणाला…

Shah Rukh Khan Ask Me Anything On Twitter : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.  रविवारी त्याने नाताळच्या निमित्ताने ‘Ask Me Anything’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली आहेत.  …

Read More »

Tunisha Sharma ते Sushant Singh Rajput; कलाकारांनी संकटाचा सामना करण्यापेक्षा जीवनयात्रा संपवली

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. तिने आयुष्य का संपावलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रसिद्धीची एक उंची गाठल्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचलणारी तुनिषा ही पहिली अभिनेत्री नाही. तिच्या आधीदेखील अनेक सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य अशाचप्रकारे संपवलं आहे.  वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) :  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने एक्स बॉयफ्रेंड …

Read More »

Main Atal Hoon : ‘मैं अटल हूँ’ सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट

Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून ‘मैं अटल हूँ’ (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकजचा फर्स्ट …

Read More »

Salman Khan Birthday : दीवाना मैं चला… सलमानला भेटण्यासाठी चाहत्याचा वेगळाच स्टंट

Salman Khan Birthday : आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहत्याने सलमानला भेटण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे. समीर त्याच्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन मुंबईला रवाना झाला आहे.  सलमान खानचा …

Read More »

Raju Srivastav Birth Anniversary : जाणून घ्या ‘द किंग ऑफ कॉमेडी’ राजू श्रीवास्तव यांचा प्रवास..

Raju Srivastav : आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची आज जयंती आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि कार्यक्रमांत काम केलं आहे.  राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हेदेखील लोकप्रिय कवी होते. राजू यांना बालपणीच मिमिक्रीची गोडी लागली. शाळेत असताना ते शिक्षकांची, खोडकर विद्यार्थ्यांची तसेच …

Read More »

Asha Parekh On Pathaan : ‘पठाण’च्या वादादरम्यान आशा पारेख यांचं वक्तव्य चर्चेत

Asha Parekh On Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आता यावर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  एका टीव्ही चॅनलला दिलेल्या …

Read More »

शूटिंगसाठी तब्बल 11 तास पाण्यात राहिली ‘ही’ अभिनेत्री

Rakul Preet Singh : रंगभूमीवरील कलाकारापासून रुपेरी पडद्यावरील कलाकारापर्यंत प्रत्येक जण आपल्या भूमिकेसाठी 100 % देत असतो. भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकारमंडळी खूप मेहनत घेत असतात. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील (Rakul Preet Singh) आपली भूमिका चोख पार पाडताना दिसून आली आहे.  एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रकुल प्रीत सिंह तब्बल 11 तास …

Read More »

Sajid Khan : साजिद खानवर पुन्हा लैंगिक छळाचा आरोप

Sajid Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शिक साजिद खान (Sajid Khan) सध्या भाईजानच्या बिग बॉसमुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. साजिद बिग बॉसममध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. गेल्या काही दिवसांत साजिदवर गंभीर आरोप केले जात आहेत.  बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉसमधून बाहेर काढण्याचीही मागणी केली गेली. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले …

Read More »

Anil Kapoor : राम लखन ते मि. इंडिया; जाणून घ्या अनिल कपूर यांचे टॉप 10 सिनेमे…

Anil Kapoor Birthday : ‘एव्हर ग्रीन’ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयासह फिटनेटमुळे ते आजही तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्मातेदेखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 सिनेमे… राम लखन (Ram Lakhan) :  राम लखन हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित …

Read More »

Aamir Khan Dangal : कोट्यवधींची कमाई करणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ला सहा वर्ष पूर्ण

Aamir Khan Dangal Six Years : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘दंगल’ (Dangal) हा सिनेमा जगभरात गाजला. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ सिनेमा होता.  पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. सिनेमाचं कथानक आणि …

Read More »

Mohammed Rafi : स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी!

Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी (Mohammed Rafi) हे स्वर्गीय आवाजाची देणगी दाभलेले लोकप्रिय पार्श्वगायक होते. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे.  मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील एका गावात झाला. मध्यमवर्गीय मुस्लिम …

Read More »

अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

Abhishek Bachchan On Taslima Nasrin: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ  बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. तसेच मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ  यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं. या …

Read More »

अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते.  जाणून घ्या कैकला सत्यनारायण यांच्याबद्दल कैकला सत्यनारायणा यांनी 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह …

Read More »

छेल्लो शोच्या टीमला देण्यात आली होती धमकी

Chhello Show: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show)   या चित्रपटाला ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाच्या टीमचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांनी सांगितलं की, त्यांनी काही लोक धमकी देत होते. तसेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.  एका मुलाखतीमध्ये  दिग्दर्शक पान …

Read More »

‘शेअर्स विकावे लागतील’; बादशाहच्या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकून नेटकरी झाले थक्क!

Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहच्या कॉन्सर्टचं आयोजन 24 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये हे कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत 999 पासून सुरु होते. पण 999 रुपयांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.  या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकीट हे 6 लाख रुपयांचे आहे.  ‘पागल’ नावाच्या या कॉन्सर्टमधील …

Read More »

‘झूमे जो पठाण’ गाण्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा भारत आहे पाकिस्तान नाही…’

KRK On Jhoome Jo Pathaan Song: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाणमधील झूमे जो पठाण हे गाणं देखील रिलीज …

Read More »

‘झुमे जो पठाण’ रिलीज; शाहरुख-दीपिकाचं नवं गाणं पाहिलंत?

Pathaan New Song OUT: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता …

Read More »

राम सेतू होणार ओटीटीवर रिलीज; कधी आणि कुठे पाहू शकणार चित्रपट?

Ram Setu OTT Release: बॉलिवूडमधील  अभिनेता  अक्षय कुमार  (Akshay Kumar)  हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्याचा राम सेतू (Ram Setu)  हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला.  या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत …

Read More »