Santosh Juvekar : संतोष जुवेकर झळकणार ‘कुत्ते’ सिनेमात

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संतोषचा आगामी ‘कुत्ते’ (Kuttye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 

संतोषने लिहिलं आहे,”मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका ‘कुत्ते’. खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक सत्यात उतरलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न ऑडिशन न देता पूर्ण झालं आहे”. 

संतोषने पुढे लिहिलं आहे,”कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा 2021 साली फोन आला. तेव्हा मी त्यांना विचारलं ऑडिशन द्यायला कधी येऊ? यावर ते म्हणाले,विशाल सरांनी स्वत: तुला घ्यावं असा आग्रह केला आहे. आयच्या गावात अजून काय पाहिजे राव. माझ्या या स्वप्नांसाठी तुमच्या शुभेच्छा, तुमची साथ आणि बाप्पाचा आशिर्वाद कायम हवा. अजून खूप काही आश्चर्याचे आनंदी धक्के मला या सिनेमामुळे मिळाले आहेत. लवकरच शेअर करेन”. 


‘कुत्ते’ 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला 

‘कुत्ते’ हा सिनेमा 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठमोळ्या संतोषसह अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह हे कलाकार झळकणार आहेत. संतोषच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आजवर संतोष ‘मोरया’, ‘झेंडा, ‘पोलीस लाइन’, ‘एक तारा’, ’36 गुण’ या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

हेही वाचा :  इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन; पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

36 Gunn : आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’; 4 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …