Tag Archives: bollywood

Golden Globes 2023: RRR चित्रपटाचा जगात डंका, मानाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन जाहीर

मुंबई: केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात आरआरआर चित्रपटाचे नामांकन झालं आहे. हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झालं असून आरआरआर या …

Read More »

Pathaan Song Besharam Rang : बेशरम रंग; ‘पठाण’ सिनेमातील पहिलं गाणं आऊट

Pathaan Song Besharam Rang : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) असे या गाण्याचे नाव आहे.  ‘बेशरम रंग’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खानची हॉट आणि सिजलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दीपिकाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं …

Read More »

शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; मंदिराच्या आवारातील व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून शाहरुख हा चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याच्या बॉडिगार्ड्ससोबत …

Read More »

…म्हणून Sushant Singh Rajput चा फ्लॅट आजही आहे रिकामा

Sushant Singh Rajput Flat : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुशांतचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आता अडीच वर्षानंतरही फ्लॅटच्या मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  सुशांत राहत असलेला फ्लॅट आता त्या फ्लॅटच्या मालकाला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही. ब्रोकरने …

Read More »

Shehnaaz Gill : Sidharth Shukla च्या ‘बर्थ-डे’ निमित्त शहनाज गिलची भावनिक पोस्ट

Shehnaaz Gill Celebrating Sidharth Shukla Birthday : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज गिल (Shehnaaz Gill) भावूक झाली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने सिद्धार्थला बर्थ-डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  शहनाजच्या हृदयस्पर्शी पोस्टने चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. शहनाजने सिद्धार्थचा एक हसणारा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं …

Read More »

Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर ते सुपरस्टार ‘रजनीकांत’; जाणून घ्या ‘थलायवा’चा फिल्मी प

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ‘थलायवा’ (Thalaiva) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.  बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत कसा झाला?  घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केले. त्यावेळी त्यांना महिन्याला 750 रुपये मिळायचे. …

Read More »

ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले… परफेक्ट फिगर

लंडन: अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमीच तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही लंडनमधील एका स्विमिंग पुलावरचा असाच एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर (Twinkle Khanna Instagram Viral Video) शेअर केला आहे. यामध्ये ती हॉट लूकमध्ये दिसून येते, तसेच ट्विंकलची परफेक्ट फिगर यामध्ये दिसते. ट्विंकलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान …

Read More »

Drishyam 2 : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Drishyam 2 Collection : वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  ‘दृश्यम 2’ने केली 200 कोटींची कमाई ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या 23 दिवसांत हा …

Read More »

‘आमचं कोकणही…’, समृद्धी महामार्गावरून अभिनेता Abhijeet Kelkar चा राज्यकर्त्यांना टोला

Abhijeet Kelkar On Samruddhi Mahamarg : ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून …

Read More »

Year Ender 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांनी जमवला 100 कोटींचा गल्ला

Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले… ब्रह्मास्त्र (Brahmastra) :  रणबीर कपूर (Ranbir …

Read More »

Sai Pallavi बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज!

Sai Pallavi Bollywood Debut : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) दबदबा आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमे आणि वेबसीरिज हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहेत. कोरोनानंतर सिनेरसिक जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहू लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत असताना आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे.  दाक्षिणात्य सिने-निर्माता अल्लू अरविंदचा ‘रामायण’ (Ramayana) …

Read More »

Dilip Kumar 100th Birth Anniversary : दिलीप साहब… बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलेले दिलीप कुमार!

Dilip Kumar 100th Birth Anniversary : बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची आज 100 वी जयंती आहे. भारतीय सिनेसृष्टीत दिलीप कुमार ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जायचे. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  मुहम्मद युसुफ खान ते दिलीप कुमार… दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1900 रोजी पाकिस्तानात झाला. त्यांचे नाव मुहम्मद युसुफ खान असे होते. घरची …

Read More »

Veena Kapoor : धक्कादायक! घरासाठी मुलाने केली अभिनेत्रीची हत्या

Veena Kapoor : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांची हत्या केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे. अभिनेत्री नीलू कोहलीने (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  43 वर्षीय मुलाने 74 वर्षीय अभिनेत्रीची बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्या …

Read More »

थरकाप उडवणारा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार; Amrish Puri यांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर!

Amrish Puri Biopic : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड आहे. अशातच आता ‘मोगॅम्बो’  उर्फ दिवंगत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा बायोपिक येणार असल्याचं समोर आलं आहे. रुपेरी पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात कसा होता हे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.  सर्वांच्या आवडीचा खलनायक! खलनायक सहसा आवडीचा होत नाही. पण अमरीश पुरी मात्र याला अपवाद आहेत. खलनायक म्हणून …

Read More »

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला काजोलचा ‘Salaam Venky’

Salaam Venky Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. नुकताच तिचा ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात काजोलसह विशाल जेठवा (Vishal Jethwa) मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत होता. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.  ‘सलाम …

Read More »

ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी Sara Ali Khan चा लोकलने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan Local Train Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस जगात वावरताना ती नेहमीच जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते. नुकतच तिने लोकन ट्रेन आणि रिक्षाने प्रवास केला आहे. प्रवासादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  ‘केदारनाथ’च्या माध्यमातून (Kedarnath) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने …

Read More »

Ashok Kumar : बॉलिवूडचा पहिला ‘अॅंटी हीरो’ अशोक कुमार!

Ashok Kumar : ‘दादामुनी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांची गणना बॉलिवूडच्या (Bollywood) अतुलनीय नायकांमध्ये केली जाते. अनेक दशकं त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे.  अशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. कुमुदलाल गांगुली असं त्यांचं नाव होतं. त्यांचे वडील वकील …

Read More »

हा थ्रिलर चित्रपट पाहताना स्क्रिनवरुन नजर हटणार नाही, संजय मिश्रा यांचा दमदार अभिनय

वध थ्रिलर Director: जसपाल सिंह संधू आणि राजीव बर्नवाल Starring: संजय मिश्रा, नीना गुप्ता, सौरभ सचदेवा Vadh Review: खून आणि वध (Vadh) यात काय फरक आहे? या दोन्ही गोष्टी एकच आहेत, असं काहींचं मत असेल पण असं नाहीये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा हा चित्रपट पाहून समजेल. ‘वध’ …

Read More »

या अभिनेत्रीला सलमान करतोय डेट? वयात 24 वर्षांचे अंतर

Salman Khan,Pooja Hegde: बॉलिवूडचा भाईजान आशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.सध्या एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत सलमान खानचं नाव जोडलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही सध्या सलमान खानला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या नात्याबाद्दल सोशल मीडियावर …

Read More »

आमिर खाननं केलं कलश पूजन, किरणसोबत केली आरती

Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आमिरनं त्याच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले. यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) यांनी आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये …

Read More »