Maharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!

Sharad Pawar On Sena BJP alliance: भारतीय जनता पक्षाने (BJP) शिवसेनेसोबतची (Shiv Sena) युती तोडली, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. मात्र शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच प्रयत्न केले. सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते दिसत होते, असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदविलं आहे. लोक माझी सांगाती या आत्मचरित्रात (Lok Maze Sangati) शरद पवार यांनी 2014 मधील राजकारणाबाबत सविस्तर लिहिलं आहे.

युतीबाबत पवार म्हणतात, फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला. निर्विवादपणे सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते दिसत होते. त्याचबरोबर पक्ष वाढविण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचीही शरद पवार यांनी कौतूक केलं आहे. शिवसेनेशी असलेलं नातं एकीकडे टिकवत असताना दुसरीकडे भाजपचा विस्तार करायचा, पक्षाची ताकद वाढवायची, असं त्यांचं एकंदरीत उद्दिष्ट दिसत होतं, असंही पवार म्हणतात.

स्वपक्षाची ताकद फडणवीस वाढवताहेत, हे शिवसेनेला थोडं उशिरा उमगलं. फडणवीस यांचं खरं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसच होती, असे सांगताना शरद पवार यांनी त्यामुळे आम्ही सावध झालो होतो, असंही म्हटलं आहे. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू'

आणखी वाचा – वस्ताद एक डाव राखून ठेवतो… शरद पवार राजीनामा मागे घेणार?

दरम्यान, भाजप-शिवसेनेतली फारकत आणखी वाढली, तर काही घडवता येईल, हे स्पष्ट असूनही काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वही त्यासाठी फारसं आग्रही नव्हतं. किंबहुना, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मानसिकतेत एक बदल झाला होता, असंही शरद पवार म्हणतात. लोक माझे सांगाती, या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …