Deepika Padukone FIFA : ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका जगातील पहिली अभिनेत्री!

Deepika Padukone FIFA : अर्जेंटिना-फ्रान्स (Argentina VS France) सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या वादादरम्यान तिने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (Fifa World Cup Finale) हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहेत. 

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये दीपिकाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ड्रेस, त्यावर चॉकलेटी रंगांचं जॅकेट आणि काळ्या रंगाचे बूट असा दीपिकाचा लूक होता. दीपिका फिफा विश्वचषकाचा एक भाग असल्याने प्रचंड आनंदी आहे. व्हायरल फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. 


दीपिकाच्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला जात आहे. 

हेही वाचा :  'कंपास' वेब सीरिज 'या' प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

शाहरुख-दीपिकाचा ‘पठाण’ 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला (Pathaan Release Date) : 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) आगामी ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची शाहरुख-दीपिकाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …