Tag Archives: बॉलिवूड

‘ताज रॉयल ब्लड’ सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी केला शेअर

Dharmendra Taj Royal Blood Series: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. धर्मेंद हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. आता त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT)  रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव ‘ताज रॉयल ब्लड’ (Taj Royal Blood) असं आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र यांनी …

Read More »

व्हॅलेंटाईन-डे ‘पठाण’साठी ठरला खास; 21व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box office Collection: अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं सजलेला पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटानं ‘व्हॅलेंटाईन-डे’ (Valentine’s Day) ला (14 फेब्रुवारी) …

Read More »

कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’मधील गाणं रिलीज

Shehzada Title Track Releases: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या ‘शहजादा’ (Shehzada) या चित्रपटाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या चित्रपटात कार्तिक हा बंटू नावाच्या एका तरुणाची भूमिका साकारत आहे. ‘शहजादा’ चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये कार्तिक हा त्याच्या आलिशान घरात एन्ट्री करताना दिसत आहे.  कार्तिकनं शेअर केला व्हिडीओ कार्तिकनं ‘शहजादा’ या चित्रपटाच्या टायटल साँगचा …

Read More »

जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका

Javed Khan Amrohi: अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लगान आणि चक दे इंडिया या चित्रपटांमुळे जावेद यांना विशेष लोकप्रिता मिळाली. तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम’ आणि ‘अंदाज अपना-अपना’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं.  दोन वर्षापूर्वी रिलीज झालेल्या सडक-2 …

Read More »

चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नाला शाहरुखनं दिली हटके उत्तरं

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  …

Read More »

‘मुघल-ए-आझम’ ते ‘चलती का नाम गाडी’; मधुबालाचे ‘हे’ सिनेमे आज घबरल्या नक्की पाहा…

Madhubala Movies On OTT Platform : बॉलिवूड सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रींच्या यादीत ‘मधुबाला’ (Madhubala) यांची गणना होते. मधुबाला यांचे खरे नाव ‘मुमताज जहान बेगम नहलवी’ होते. पण त्या ‘बेबी मुमताज’ या नावाने देखील लोकप्रिय होत्या. तसेच ‘मुघल-ए-आझम’ (Mughal-E-Azam) या सिनेमामुळे त्या ‘अनारकली’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या. 14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं. आजही त्यांचे …

Read More »

‘डेस्टिनेशन वेडिंग’ साठी सेलिब्रेटींकडून राजस्थानला पसंती

Destination Wedding: ‘डेस्टिनेशन वेडिंग’ (Destination Wedding) करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा वाड्यामध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याचा ट्रेंड सध्या अनेक जण फॉलो करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील परदेशात जाऊन लग्न केले होते. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी इटलीला …

Read More »

श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा

Zeenat Aman: 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  झीनत अमान …

Read More »

‘बिग बॉस 16’च्या महाअंतिम सोहळ्यात सलमाननं लग्नाबाबत सोडलं मौन

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,”मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही”.  लग्न न करण्याबाबत सलमान म्हणाला… ‘बिग बॉस 16’ गाजवणारा …

Read More »

‘अंधारातून पुन्हा प्रकाशात…’; शाहरुखची खास पोस्ट व्हायरल

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर झाला आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटानं भारताबरोबरच परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं …

Read More »

दिल्लीत होणार सिद्धार्थ-कियाराचं ग्रॅंड रिसेप्शन!

Kiara Advani Bridal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंनधात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.  कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे (Kiara Advani Sidharth Malhotra) रोमॅंटिक फोटो शेअर करत  चाहत्यांना आनंदाची …

Read More »

ज्युनिअर शाहरुख खानवर हल्ला; आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai: मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) फिल्मसिटीमध्ये (Filmcity) ज्युनिअर कलाकार (Junior Artist) म्हणून काम करणाऱ्या ज्युनियर शाहरुख खान (Shah Rukh Khan) उर्फ राजू राहिकवर (Raju Rahikwar) याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजू राहिकवर हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  गोरेगाव (Goregaon) फिल्मसिटीमध्ये (Filmcity) असणाऱ्या बॉलिवूड पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांचे मनोरंजन …

Read More »

अक्षय आणि मृणालचा रोमँटिक अंदाज; ‘सेल्फी’ मधील गाण्याचा टीझर रिलीज

Selfiee song Kudiyee Ni Teri teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील ‘कुडीये नी तेरी’ (Kudiyee Ni Teri) या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ‘कुडीये नी तेरी’ गाण्याचा 17 सेकंदाचा टीझर सध्या सोशल …

Read More »

‘पठाण’ च्या कमाईत 13 व्या दिवशी घट; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Pathaan Box Office Day 13: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 13 दिवस झाले आहे. या चित्रपटानं एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना दिसत आहे. या चित्रपटानं दुसऱ्या वीकेंडला चांगली कमाई केली. पण सोमवारी (6 फेब्रुवारी) या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.  रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट …

Read More »

Adil Khan Girlfriend : राखी सावंतची ‘सवत’, ‘ही’ आहे आदिलची गर्लफ्रेंड, कोण आहे तनू?

Rakhi Sawant’s Husband’s Girlfriend Photo got Viral : ‘ड्रामा क्वीन’ (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने पती आदिल खानचे विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असल्याचा दावा केला आहे. राखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे. हे नाव समोर येताच आदिलच्या …

Read More »

प्रेक्षकांनी सिनेमावर कधीही बहिष्कार टाकलेला नाही : अनुपम खेर

Anupam Kher On Shah Rukh Khan Pathaan : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमावर भाष्य केलं आहे. नुकतचं एका मुलाखतीत ते म्हणाले,”एखाद्या ट्रेंडचा सिनेमा पाहण्यावर किंवा न पाहण्यावर फरक पडत नाही.जर तुम्हाला त्या सिनेमाचा ट्रेलर आवडला असेल आणि त्यावरुन सिनेमा पाहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो …

Read More »

कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार!

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  कियारा-सिद्धार्थच्या ‘नो फोन पॉलिसी’मुळे …

Read More »

दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय इमरान खानचं नाव

Imran Khan: प्रसिद्ध अभिनेता इमरान खान हा (Imran Khan) बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहात आहे. 2015 मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर इमराननं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि अवंतिका मलिक यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुरु होती. आता इमरानचं नाव एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील …

Read More »

चिमुकलीच्या व्हायरल व्हिडीओला शाहरुखचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, ‘देशाच्या तरुण पिढीचा…’

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अहाना नावाच्या मुलीचा आहे. ही मुलगी व्हिडीओमध्ये ‘पठाण आवडला नाही’ असं म्हणत आहे. या व्हिडीओला शाहरुख …

Read More »