केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Kedarnath Gold Plate Controversy: समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम (Kedarnath Dham) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

पुरोहितांचा व्हिडिओ झाला व्हायरल 

संतोष त्रिवेदी यांचा मंदिर परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी दावा केला आहे की, मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सव्वा अरब किंमतीचे सोने पितळेत रुपांतर झाले आहे. यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंदिरात लावण्यात असलेला सोन्याचा पत्रा हा पितळेचा असून यात सव्वा अरब रुपयांचा घोटाळा झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, यावेळी संतोष त्रिवेदी यांनी केली आहे. 

हेही वाचा :  Ayodhya Ram Temple: 'त्यानंतरही नरेंद्र मोदी जिवंत असतील, तर...,' काँग्रेस नेत्याला शंका, भाजपा संतापली

कारवाई करण्याची मागणी

संतोष त्रिवेदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करुन असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे बद्रीनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने त्रिवेदी यांचे आरोप फेटाळले आहेत. ट्रस्टकडून एक पत्रही जारी करण्यात आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींवर लावण्यात आलेले सोने ही मागील वर्षी एका दानशूर व्यक्तीने दान केले होते. त्याच्याच मदतीने हे काम केले आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

समितीने आरोप फेटाळले

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून चुकीची माहिती दिली जात आहे. या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार सोन्याची किंमत एक अरब १५ कोटी आहे. मात्र, कोणत्याही पुराव्याशिवाय खोटी माहिती देऊन भाविकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

14.38 कोटींचे सोने

ब्रदिनाथ केदारनाथ ट्रस्ट समितीने जारी केलेल्या पत्रकानुसार, केदारनाथच्या गाभाऱ्यात 23,777.800  ग्रॅम सोने लावण्यात आले आहे. ज्याचे आत्ताच्या बाजारभावानुसार 14.38 कोटी इतके मुल्य आहे. स्वर्णजडित काम करण्यासाठी यामध्ये कॉपर प्लेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचे मूळ वजन 1,001.300  किलोग्रॅम असून किंमत 29 लाख इतकी आहे. दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :  Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …