जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका

Javed Khan Amrohi: अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लगान आणि चक दे इंडिया या चित्रपटांमुळे जावेद यांना विशेष लोकप्रिता मिळाली. तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम’ आणि ‘अंदाज अपना-अपना’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 

दोन वर्षापूर्वी रिलीज झालेल्या सडक-2 या चित्रपटामध्ये जावेद खान अमरोही यांनी काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी पाक्या ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्याच बरोबर जावेद खान अमरोही यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केलं. ते इप्टाचे (इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन) सक्रिय सदस्य होते. फिर हेरा फेरी या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. तसेच मिर्झा गालिब या मालिकेमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. 1993 मध्ये रिलीज झालेल्या हम है राही प्यार के या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. 

हेही वाचा :  इंग्लंडच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शन्स, सोशल मीडियावर मीम्म्सचा पाऊस 
[fb]

जावेद खान अमरोही यांना गेल्या काही दिवसांपासून श्वासनाचा त्रास होता. गेल्या एक वर्षापासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांना सांताक्रुझ येथील सूर्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाले होते. ओशिवारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …