Mother Son Marriage : प्रेमासाठी वाटेल ते..! नवऱ्याला सोडलं, मुलाशी लग्न आणि आता गरोदर

Mother Son Marriage : आई मुलाचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं…भलं ते नातं रक्ताच असो किंवा सावत्र आईमुलाचं…गेल्या काही वर्षांपासून प्रेमाची, नात्याची संकल्पनाच बदलली आहे. गेल्या काही वर्षांत प्रेम, लग्न, रिलेशनशीपचे बदलेले रुप पाहून धक्का बसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये मुलीने वडिलांशी लग्न (Father Daughter relationship) केलं, नवरा असूनही विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair), कमी वयाच्या तरुणासोबत संबंध, मित्राच्या पत्नीवर प्रेम, अगदी नवरा बायको आणि ती म्हणजे प्रेयसी एकत्र राहतात. पण सध्या जी घटना समोर आली आहे ती ऐकून पायाखालची जमीन सरकते. पतीला सोडून तिने मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि ती गर्भवती झाली…(Mother Son Marriage Viral News)

नेमकी काय आहे ही घटना? 

मरीना बालमाशेवा (Marina Balmasheva) या सोशल मीडिया स्टारने 2007 मध्ये तब्बल 16 वर्षांपूर्वी अॅलेक्सी शाव्हरिनशी लग्न केलं. तसं तर हे अॅलेक्सी शाव्हरिनचं दुसरं लग्न होतं. त्याला व्लादिमीर हा मुलगा देखील होता. लग्नाचा वेळी तो 7 वर्षांचा होता. अॅलेक्सीने सांगितले की व्लादिमीर जसजसा मोठा झाला तसतसं मरीनाचं वागणं बदलू लागलं. जेव्हा व्लादिमीर विद्यापीठाच्या सुट्ट्यांमध्ये यायचा तेव्हा मरीना त्याच्यासोबत फ्लर्ट करायची.

तिचा लैंगिक छळ करायची. अशा परिस्थितीत व्लादिमीरही मरीनाकडे आकर्षित होऊ लागला. दोघांमध्ये त्यांच्या पाठीमागे शारीरिक संबंधही (wife cheated husband)  निर्माण झाले आणि मरिना गरोदर राहिली. (trending video Mother Son Marriage wife Extra Marital Affair Son cheated husband Woman Pregnant with stepson Marina Balmasheva viral video on social media)

गरोदर राहिली अन् मग…

इंस्टाग्राम सेन्सेशन मरिनाने तिच्या सावत्र मुलाच्या प्रेमात पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवसांनी तिने मुलगा व्लादिमीरशी लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. इतकंच नाही तर मरीनाने असेही सांगितलं की ती व्लादिमीरच्या मुलाची आई होणार आहे. याक्षणी, मरीना आणि व्लादिमीरला एक मुलगी आहे, जो 2 वर्षांपेक्षा मोठा असेल. तर ऑगस्ट 2022 मध्ये मरिना पुन्हा गरोदर (Woman Pregnant with stepson) राहिली, परंतु तिने इन्स्टावर मुलाबद्दल कोणतेही अपडेट शेअर केली नाही. 

दुसरीकडे, मरीनाच्या पतीने आरोप केला आहे की, तिने माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवलं. पण दुसरीकडे मरीना आणि तिचा नवरा व्लादिमीर (सावत्र मुलगा) त्यांच्या नवीन जीवनात खूप आनंदी आहेत आणि त्यांचे फोटो सोशल साइट्सवर शेअर करत आहेत. सध्या मरीना 37 वर्षांची आहे आणि तिचा सावत्र मुलगा 23 वर्षांचा आहे. त्याच वेळी, पहिल्या पतीचं वय 47 वर्षे आहे.

रशियन ब्युटी मरिना म्हणाली की, जेव्हा मी व्लादिमीरला दुसऱ्या गर्भधारणेबद्दल सांगितले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर हसूही होते. मरीनाच्या मते, व्लादिमीरचे डोळे जगातील सर्वात सुंदर आहेत. ”माझा नवरा, जो एकेकाळी माझा सावत्र मुलगा होता, तो त्याच्या मुलांसाठी सर्वोत्तम पिता आहे.” 

पहिल्या लग्नानंतर मरिनाचं वजन खूप वाढलं होतं, परंतु कठोर परिश्रमानंतर ती खूप फिट दिसते. मरीना (marina_balmasheva) चे Instagram वर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, जिथे ती तिच्या पती आणि लहान मुलीसोबतचे फोटो शेअर करते.

हेही वाचा :  ShivSenaCrisis : शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …