साधेपणा आणि एलिगंट लुक यांचे समीकरण म्हणजे समंथा रूथ प्रभूची स्टाईल, सौंदर्याने केले सर्वांना घायाळ

समंथा रूथ प्रभूला पाहिल्यानंतर तिची ठेवण ही भारतीय महिलांचे परफेक्ट सौंदर्य असल्यासारखेच वाटते. समंथाची स्टाईलही तितकीच तिच्या चाहत्यांना भावते. समंथाचा स्वतःचा ‘साकी’ हा कपड्यांचा ब्रँड असून पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ यामध्ये दिसून येतो. सध्या फ्युजन आऊटफिट्सचा ट्रेंड आहे. ऑफिस असो अथवा कोणतेही सण समारंभ असे फ्युजन कपडे नेहमीच आकर्षक आणि आरामदायी ठरतात. तुम्हालाही समंथाच्या स्टाईलमधून याची प्रेरणा घेता येईल. टाकूया एक नजर. (फोटो सौजन्य – समंथा प्रभू)

​सलवार, कुर्ता आणि दुपट्टा​

​सलवार, कुर्ता आणि दुपट्टा​

सिव्हर बॉर्डर असणाऱ्या कुर्ता, सलवार आणि गुलाबी दुपट्टा असणारा हा समंथाचा लुक सणासाठी परफेक्ट आहे. यासह ऑक्सिडाईज्ड कानातले घालून समंथाने आपला लुक पूर्ण केला आहे. यावरील स्ट्रिप्स डिझाईनमुळे तुम्हाला अधिक नव्या ट्रेंड लुकचा फील मिळेल. तर रंगाचे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे.

​पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन​

​पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन​

परफेक्ट फ्युजन ड्रेससाठी तुम्ही अशा पद्धतीची स्टाईल कॅरी करू शकता. पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन कधीच चुकीचे ठरत नाही. तर एखाद्या पटकन ठरलेल्या पार्टीसाठी अथवा लंच, डिनर डेटसाठीही तुम्ही समंथासारखी स्टाईल करून जाऊ शकता. यासह नैसर्गिक मेकअपचा आधार घेऊन तुमचा लुक पूर्ण करा.

हेही वाचा :  Mahashivratri 2023: बॉलिवूडचे हे कलाकार शिवभक्तीत लीन

( वाचा – छोटीशी साईशा भोईर फॅशन स्टाईलमध्ये देतेय अभिनेत्रींना मात, निरागसतेवर आहेत लाखो फिदा)

​कम्फर्टेबल कुर्ता आणि ऑफिस स्टाईल​

​कम्फर्टेबल कुर्ता आणि ऑफिस स्टाईल​

ऑफिसमध्ये तुम्हाला जर सूदिंग आणि डोळ्याला आरामदायी रंगाचे कपडे घालायचे असतील अथवा आता उन्हाळा लवकरच सुरू होईल. त्यासाठी तुम्ही समंथाच्या साकी कलेक्शनमधील ही स्टाईल नक्की फॉलो करू शकता. यासह समंथाने केलेला नॅचरल न्यूड मेकअप आणि कानात लहानशा सिल्व्हर रिंग्ज लक्षवेधी ठरत आहेत.

(वाचा – गालावर खळी डोळ्यात धुंदी, ‘फुलराणी’ प्रियदर्शिनीचा काळजाचा ठाव घेणारा लुक)

​यल्लो वनपिस विथ जॅकेट​

​यल्लो वनपिस विथ जॅकेट​

समंथाने घातलेला हा वनपिस आणि त्याचा रंग डोळ्यांना अत्यंत सुखद आनंद देत आहे. नैसर्गिक पिवळ्या रंगाचा हा वनपिस खूपच सुंदर असून त्यावर त्याच रंगाचे जॅकेट तुम्हाला आधुनिक लुक मिळवून देण्यास मदत करेल. ऑफिस लुक असो अथवा कोणत्याही ठिकाणी मीटिंगला जाण्यासाठी समंथाचा हा लुक तुम्ही प्रेरणा म्हणून नक्कीच करू शकता.

(वाचा – रेड लेदर जंपसूट, एअरपोर्ट लुकची अशी कमाल की चाहत्यांची मलायकावरून नजर हटेना)

​चेक्स रेड कुरता आणि पँट टाईप सलवार​

​चेक्स रेड कुरता आणि पँट टाईप सलवार​

लेगिंग्जपेक्षा आता पँट टाईप सलवारची फॅशन अधिक दिसून येते. तुम्हाला थोडासा साऊथ इंडियन टच हवा असेल तर समंथाची साकी कलेक्शनची ही स्टाईल नक्कीच मदत करू शकते. गोल्डन बॉर्डर असणारा हा कुरता आणि खाली प्लेन पँट अत्यंत सुंदर दिसत आहे. एखाद्या सणासाठी तुम्ही स्टाईल कॅरी करू शकता. तुम्हाला हवं तर यावर तुम्ही मोठे गोल्डन कानातले घातल्यास अधिक आकर्षक दिसतील.

हेही वाचा :  Samantha Ruth Prabhu : समंथाची सोशल मीडिया पोस्ट, चाहते म्हणाले.... 

​अक्वा ब्ल्यू वनपिस​

​अक्वा ब्ल्यू वनपिस​

अक्वा ब्ल्यू रंग हा डोळ्यांना खूपच थंडावा देतो. सध्या पेस्टल आणि अक्वा रंग हे अधिक ट्रेंडमध्ये आहेत. समंथाचा हा ड्रेस तुम्हीदेखील कोणत्याही पार्टीसाठी अथवा मित्रमैत्रिणींसह बाहेर जाताना वापरू शकता. निसर्गाशी मिळताजुळता असा हा रंग हवाहवासा वाटतो आणि यामध्ये तुमचे फोटोही अत्यंत सुंदर येऊ शकतात.

समंथा रूथ प्रभूचे हे लुक्स तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की सांगा आणि तिच्या स्टाईलवरून प्रेरणा घेऊन तुम्हीही दिसा अधिक आकर्षक आणि सुंदर!

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …