काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result : कर्नाटकात काय निकाल लागणार याची मोठी होती. मात्र, सत्ताधारी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांना (भाजप) घोडेबाजार करण्याची संधी मिळणार नाही. ते कर्नाटकातील पराभव सहजासहजी पचवणार नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या दोन्ही साम्य म्हणजे चौकशी संस्थाचा झालेला गैरवापर, पैशाचा वापर दिसून आला. मात्र, जनतेने कौल दिला आहे. स्थानिक विषय कर्नाटकात म्हत्त्वाचे राहिले. रोजगार नाही, महागाईचा मुद्दा महत्त्वाचा राहिला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही. काँग्रेसचा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. भाजपला अंतर्गत वाद आणि बाहेरील नेते यांना जास्त ताकद देणे यामुळे लिंगायत समाज नाराज. बाहेरुन चेहरा आणला तो किती प्रभावी ठरेल हे पाहावे लागेल. कर्नाटकात स्थानिक नेतृत्व दिले त्याचा फायदा झाला आहे. बाहेरील नेते लादले तर फटाक बसतो. स्थानिक नेतृत्त्व दिले पाहिजे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.

हेही वाचा :  सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ

यावेळी चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. त्यांनी तशी नाराजीही व्यक्त केली. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार देणे खटकते आहे. वास्तविक चर्चा करुन भूमिका घेता आली असती. पणे तसे त्यांनी केलेले नाही, असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल’

 कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजपने गेल्यावेळी ज्या पद्धतीने हॉर्स ट्रेडिंग करुन केली. मोठ्या प्रमाणात कर्नाटकात भ्रष्टाचार केला आणि जातीपातीचे राजकारण केले.  त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी बहुल असलेल्या सीमा वर्ती भागात जाऊन प्रचार केला मात्र त्यांनाही जनतेने नाकारलं हीच परिस्थिती महाराष्ट्रात कोणत्या देशात होईल दरम्यान ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. 

‘भाजप हटाओ, संविधान बचाव’ – ठाकरे गट

दरम्यान, ठाकरे गटाकडूनही मोठी प्रतिक्रीया आली आहे. कर्नाटकमध्ये भाजपला सत्तावापसी करण्यात अपयश आले आहे. मोदी आणि शाहांना जनतेनं झिडकारलं, अशी तिखट प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. ही लोकशाही स्टोरी आहे, असे ते म्हणाले. तर भास्कर जाधव म्हणाले, कर्नाटकच्या निकालाने आम्ही आनंदी आहोत. मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो. भाजप हटाओ देश बचाव, भाजप हटाओ संविधान बचाव हा निकाल कर्नाटकच्या जनतेने दिला आहे. भाजपला पराभूत करायचं असेल असंच एकजूट होऊन काम करावं लागेल. सुषमा अंधारे म्हणाल्या, हे निकाल महाविकास आघाडी करता शुभ संकेत आहेत. ‘मोदी हे तो मुमकीन है’, असे म्हणणाऱ्यांना चपराक आहे. गेल्या 9 वर्षात मोदींने पसरवलेले हेट पॉलिटिक्सला लोक कंटाळले आहेत. या निकालाची ऊर्जा महाराष्ट्रात मिळेल. 

हेही वाचा :  construction workers stay at kalina campus of the university zws 70 | विद्यापीठाच्या कलिना संकुलात बांधकाम मजुरांचा मुक्काम



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …