वाचा: Valentine’s Day 2022: Samsung ची Galaxy Watch 4 वर मोठी ‘ऑफर’
इंटर्नल स्टोरेज : यात सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे स्मार्टफोनचे स्टोरेज क्लियर करणे. फुल्ल स्टोरेजमुळे फोनचा वेगही कमी होतो. यासाठी तुम्ही गुगलच्या फाइल्स अॅपची मदत घेऊ शकता. हे तुम्हाला डुप्लिकेट फोटो, मोठ्या फाइल्स आणि अनावश्यक मीडिया फाइल्स हटवण्यात मदत करते. हे अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते आणि त्याचा आकारही खूपच लहान असतो. तसेच, आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स असतात. पण, आपण यापैकी फक्त काही नियमितपणे वापरतो. अशा स्थितीत तुम्ही फोनवरून वापरत नसलेले अॅप्स अनइंस्टॉल करणे कधीही चांगले. तसेच, तुमच्या फोनची मेमरी सतत व्यापणारे अॅप्स टाळण्याचा प्रयत्न करा. फोन रीस्टार्ट करा: कधीकधी तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट केल्याने RAM मोकळी होते आणि अॅप्स रीसेट होतात. ज्या फोनची रॅम कमी आहे त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते.
ते ८ GB किंवा १२ GB RAM असलेल्या नवीन Android डिव्हाइसेससाठी काम करत नाही. याशिवाय, फोनचा वेग कमी होण्याचे एक कारण म्हणजे अॅप्सचा मोठा आकार. अशात फोनमध्ये लाइट व्हर्जन अॅप्स वापरणे चांगले . तुम्ही Play Store वरून Facebook ते Instagram आणि Twitter वर लोकप्रिय अॅप्सची लाइट आवृत्ती डाउनलोड करू शकता. त्यांच्यामध्ये वैशिष्ट्यांचा थोडासा अभाव असेल, परंतु तुमच्या फोनवर भरपूर स्टोरेज सेव्ह केले जाऊ शकते. जर तुमच्या फोनमधील सर्व ट्रिक्स वापरल्यानंतरही काही फरक पडत नसेल तर शेवटची पद्धत म्हणजे फॅक्टरी रीसेट. याद्वारे तुमचा फोन पूर्णपणे नव्यासारखा होईल. म्हणजेच, त्यामध्ये तेच सेटिंग्ज आणि अॅप्स राहतील, जे नवीन फोन खरेदी करताना त्यात होते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ही पद्धत वापरल्याने तुमचा सर्व डेटा देखील हटविला जाईल. त्यामुळे तुमचे सर्व फोटो, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट इत्यादींचा बॅकअप तुम्हाला आधीच घ्यावा लागेल.
वाचा: याला म्हणतात ऑफर ! ३२ ते ५५ इंच, सर्वच Smart TV वर मिळवा हजारोंचा डिस्काउंट, पाहा ऑफर्स-फीचर्स
वाचा: रोज २ GB डेटा ऑफर करणारे स्वस्त प्लान्स, दिवसाचा खर्च ८ रुपयांपेक्षा कमी, मिळतात ‘हे’ बेनिफिट्स, पाहा डिटेल्स
वाचा: अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘या’ स्टायलिश स्मार्टवॉचेस, वॉचमध्ये अनेक मॉडर्न फीचर्स, पाहा लिस्ट