लोकसत्ता विश्लेषण: ‘ह्युंदाई’वर बंदी घालण्याची का केली जातेय मागणी?; काय आहे यामागील पाकिस्तान कनेक्शन

कालपासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून सुरु असणारा हा प्रकार नक्की आहे तरी काय जाणून घ्या…

मूळची दक्षिण कोरियन कंपनी असणारी आणि भारतामधील दुसरी सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी अशी ओळख मिळवणारी ह्युंदाई ही वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. कालपासून ट्विटरवर या कंपनीबद्दलचे अनेक हॅशटॅग व्हायरल होताना दिसतायत. यामध्ये #HyundaiWithTerrorist, #HyundaiPakistan, #Hyundai, #HyundaiMustApologise, #HyundaiIndia, #HyundaiAntiIndian, #BoycottHyundai या अशा सर्व हॅशटॅगचा समावेश आहे. लाखो भारतीय या कंपनीवर संतापलेत. बरं या सर्वाला कारण आहे पाकिस्तान आणि काश्मीर. कालपासून सुरु असणारा हा प्रकार (What is the Hyundai Motor tweet controversy) नक्की आहे तरी काय जाणून घेऊयात…

थोडक्यात घडलं काय?
ह्युंदाई कंपनीच्या पाकिस्तानमधील अकाऊंटवरुन काश्मीरसंदर्भात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने नवीन वाद निर्माण झालाय. या प्रकरणावरुन ह्युंदाईवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील मागणी करणारा ट्रेण्ड व्हायरल होऊ लागल्यानंतर आता कंपनीनच्या भारतातील व्यवस्थापनाने एक पत्रच जारी केलं आहे. “असंवेदनशील मुद्द्यांसाठी कंपनीचे धोरण हे शून्य सहिष्णुतेचं आहे,” असं कंपनीने म्हटलंय.

नक्की काय होतं पोस्टमध्ये?
झालं असं की पाच फेब्रुवारी रोजी ह्युंदाई पाकिस्तानच्या सोशल मीडिया पेजवरुन काश्मीरसंदर्भात वादग्रस्त पोस्ट करण्यात आली. ‘काश्मीरमधील जनते’सोबत आम्ही त्यांच्या ‘स्वांत्र्याच्या लढ्यात’ सोबत आहोत अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आळी होती. पाकिस्तान दरवर्षी पाच फेब्रुवारीचा दिवस ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा करतो. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना समर्थन दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी कंपनीने ही वादग्रस्त पोस्ट केली होती ज्यात काश्मीरच्या दल लेकचा फोटो वापरुन वर काश्मीर हे शब्द काटेरी कुंपणामध्ये दाखवण्यात आलेले. वाद झाल्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आलीय.

हेही वाचा :  ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी नितेश राणेंची ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त…

भारतात सोशल मीडियावर संताप…
भारतामध्ये #BoycottHyundai हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लगला. यावर लाखो ट्विट्स पडले. अनेकांनी या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर पाकिस्तानमध्ये किती गाड्या विकल्या जातात आणि भारतात किती इथपासून ते आता ह्युंदाई हे उद्योग सुद्धा करु लागलेत असा टोला लगावलाय.

१)

२)

३)

४)

५)

कंपनीने जारी केलं पत्र…
या वादानंतर ह्युंदाई इंडियाने सोशल नेटवर्किंगवरुन एक पत्रक जारी केलं. आम्ही आमच्या राष्ट्रीयत्वाच्या धोरणासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसून त्यासाठी खंबीरपणे उभे आहोत, असं कंपनीने या पत्रकात म्हटलंय. “समाज माध्यमांवरील काही पोस्ट ह्युंदाई मोटर्स इंडियाशी जोडल्या जात आहेत. मात्र आमचं या मोठ्या देशाप्रतीचं प्रेम आणि सेवा कायम आहे. ह्युंदाई ब्रॅण्डसाठी भारत हा देश दुसऱ्या घराप्रमाणेच आहे. असंवेदनशील मुद्द्यांसाठी कंपनीचे धोरण हे शून्य सहिष्णुतेचं असून अशाप्रकारच्या कोणत्याही वक्तव्याचा आम्ही निषेध करतो,” असं म्हटलंय.

पाकिस्तानमध्ये ह्युंदाईने निशात मिल्स या कंपनीसोबत करार केला असून या कंपनीच्या माध्यमातून ते पाकिस्तानमध्ये गाड्या बनवतात. तर भारतामध्ये ही कारनिर्मिती क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कारनिमिर्ती आणि विक्रीच्या बाबतीत भारतात मारुती सुझूकीनंतर ह्युंदाईचा क्रमांक लागवतो.

हेही वाचा :  वर्ल्डकप जिंकणाऱ्या ‘मराठी’ खेळाडूनं केली फसवणूक? BCCIकडं दाखल झाली ‘गंभीर’ तक्रार!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …