दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय इमरान खानचं नाव

Imran Khan: प्रसिद्ध अभिनेता इमरान खान हा (Imran Khan) बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहात आहे. 2015 मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर इमराननं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इमरान आणि अवंतिका मलिक यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुरु होती. आता इमरानचं नाव एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. नुकताच अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन आणि इमरानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे इमरान हा लेखाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लेखानं इमरानचा हात पकडलेला दिसत आहे. या फोटोमध्ये लेखा ही ब्लू फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. तर इमरान हा ब्लॅक टी-शर्ट, ब्लू पँट अशा सुपर कूल लूकमध्ये दिसत आहे. इमरान आणि लेखानं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

अवंतिका मलिक आणि इमरान खान यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2014 साली त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलाचे नाव इमारा असं ठेवलं. काही महिन्यांपूर्वी अवंतिका आणि इमरान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.  2020 मध्ये अवंतिकानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अवघड असतात, असं लिहिलं होतं. काही महिन्यांपूर्वी आमिरची मुलगी आयरा खान हिने इमरानसोबतचा फोटो देखील शेअर केला होता. इमरान खाननं सोशल मीडियावर अवंतिका मलिकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 


इमरानचे चित्रपट 

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटामधून इमरान खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘देल्ही बेली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

हेही वाचा :  Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Imran Khan : आमिरनंतर आता त्याचा भाचाही घेणार घटस्फोट? इमरान आणि अवंतिकाच्या नात्यामध्ये दुराव्याची चर्चा

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …