आता या यादीत नाव आलं आहे ते अभिनेत्री श्रुती अत्रे हिचं. पण श्रुतीला बिग बॉसकडून खरोखर विचारणा झाली आहे का, किंवा तिने होकार दिला आहे का याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे गुलदस्त्यात आहे. श्रुतीला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तिचे चाहते मात्र उत्सुक आहेत.
हे वाचा-‘ब्रह्मास्त्र’मध्ये काम करायला तयार नव्हते नागार्जुन? या एका अटीवर झाले तयार
‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतील राजश्री ढाले पाटील या भूमिकेने श्रुतीचा ठसकेबाज अंदाज प्रेक्षकांना पाहिला. साताऱ्याची श्रुती आता लग्नानंतर पुणेकर तर कामाच्या निमित्ताने मुंबईकर आहे. बापमाणूस या मालिकेतील सुयश टिळकची नायिका गीता हे पात्रही श्रुतीच्या चाहत्याच्या विशेष पसंतीचं. साधीसरळ गीता साकारल्यानंतर थेट श्रुती अत्रे हिने राजश्री ढाले पाटील ही खलनायिकाही तितक्याच ताकदीने वठवली. पण गेल्या काही दिवसांपासून तिची राजा रानीची गं जोडी या मालिकेतील भूमिका पडद्याआड गेली आहे. त्यामुळे श्रुतीचे चाहते तिला पुन्हा ऑनस्क्रिन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी होण्यास श्रुतीने होकार दिला असल्यास तर चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये कोण कोण सेलिब्रिटी येणार याबाबत रोज एक नवी माहिती येत असते. गेल्याच आठवड्यात अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण ही जोडी येणार असल्याची चर्चा होती. या जोडीचा घटस्फोट झाला आहे. स्नेहाने अनिकेतवर छळवादाची केस दाखल केल्याने हे प्रकरण गाजलं होतं. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्येही स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर हे घटस्फोटित जोडपं होतं. सुंदरा मनामध्ये भरली फेम भ्या म्हणजेच समीर परांजपे हादेखील बिग बॉसच्या घरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सध्या मालिकेतून त्याचे पात्र गायब झाल्याचे दिसते आहे.
हे वाचा-मला RSS मध्ये घ्या म्हणतोय KRK! मोहन भागवत आणि फडणवीसांंकडे केली मागणी
बिग बॉस मराठी शो सुरू होण्यासाठी आता १५ दिवसच उरले आहेत. नव्या पर्वात होस्ट महेश मांजरेकर यांनी काही बदल केले आहेत. घरातील रचना कशी असेल, खेळ कोणते असतील, टास्क काय असतील, कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील अशा उत्सुकता आहेतच ,पण खरी मजा येणार आहे ती या घरात कोण सेलिब्रिटी येणार त्यावरून. अभिनेत्री श्रुती अत्रे येण्याची शक्यता अशी बातमी आली आहे. श्रुती अभिनेत्री म्हणून तर प्रेक्षकांनी पाहिली, आता ती व्यक्ती म्हणून कशी आहे, तिचा जीवनप्रवास कसा आहे, सगळ्या सुविधांपासून १०० दिवस लांब राहताना श्रुती कशी वागू शकते, तिच्या व्यक्तीमत्वाचे पैलू कसे आहेत हे सगळं पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळू शकते.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या